Manoj jarange Rally : अवघा मराठा एकवटला अंतरवाली सराटीत; वाहनांच्या ४० किमीपर्यंत रांगा, शाळांना सुटी

Antarwali Sarati Sabha : सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी चाळीस किलोमीटरपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत अंतरवाली सराटीत दुपारी सभेचे आयोजन केले आहे. या सभेस जाण्यासाठी शनिवारी सकाळपासून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. काहीजण तर या ठिकाणी शुक्रवारपासून मुक्कामी होते. (A large crowd of Maratha community for meeting in Antarwali Sarati)

सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी चाळीस किलोमीटरपासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर-बीड महामार्गाच्या दोन्ही बाजू फक्त सभेकडे जाण्यासाठी रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच महामार्गाच्या दोन्ही लेन मराठा मोर्चासाठी मोकळ्या ठेवण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Family : मनोज जरांगेंच्या पाठीशी आईचा आशीर्वाद, सभेला उपस्थित...

अंतरवाली सराटीत सभेसाठी शंभर एकरावर मोठा मंडप उभारण्यात आला आहे. मंडपाला ‘गरजवंत मराठ्यांचा लढा’ असे नाव देण्यात आले आहे. सभा मंडपातील मराठा बांधवाला व्यवस्थित भाषण ऐकू यावे. तसेच, दिसावं यासाठी मोठमोठ्या स्क्रीनची सोय करण्यात आली आहे. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी एकूण ७ प्रवेशद्वार असून, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. सभेच्या परिसरातच पिण्याच्या पाण्याची सोय तसेच फिरते दवाखाने, रुग्णवाहिकाही उपलब्ध असणार आहेत.

या सभेसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. राखीव दलाबरोबरच एक हजार पुरुष तसेच महिला पोलिस, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक असा फौजफाटाही तैनात असणार आहे. संपूर्ण बंदोबस्ताची जबाबदारी जालना जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांकडे असणार आहे.

Manoj Jarange Patil
Sudhir Tambe News : काँग्रेसमधून निलंबित सुधीर तांबेंची लवकरच घरवापसी; पण ते मनमोकळेपणाने रुळतील का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com