Manoj Jarange Patil News : मनोज जरांगेंचा कृषीमंत्र्यांना एक फोन अन् शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा दिला शब्द

Phone call from Manoj Jarange Patil, and an assurance of immediate help : मी ही नुकसानग्रस्त भागात पाहणी करत असल्याने आपला फोन पाहिला नाही. फोन गाडीत होता, मी बाहेर होतो. नंतर तुमचा फोन आल्याचे लक्षात येताच तुम्हाला संपर्क साधल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
Dhananjay Munde - Manoj Jarange Patil
Dhananjay Munde - Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात गुडघाभर पाणी साचले असून पीके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी राजकीय नेत्याचे दौरे सुरू झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याच्या बानेगावात जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.

गुडघाभर पाणी साचलेल्या शेतात उभं राहूनच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावला. पण स्वतः मुंडे हे मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे जरांगे यांचा संपर्क होऊ शकला नाही. पण मुंडे यांनी फोन पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने जरांगे यांना फोन केला. अतिवृष्टीमुळे शेतात काहीच शिल्लक राहिले नाही, गुडघाभर पाणी झाल्याने पीके वाहून गेली, बुडाली.

त्यामुळे पंचनामे ई-पीक पाहणी यात बराच वेळ जाईल. सध्या शेतकऱ्याला तातडीने मदतीची गरज असल्याचे जरांगे पाटील यांनी मुंडेंच्या निदर्शनास आणून दिले. यावर सरसकट शेतकऱ्यांना शासन तातडीने मदत करणार आहे, अशा शब्द धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांना दिला. मी ही नुकसानग्रस्त भागात पाहणी करत असल्याने आपला फोन पाहिला नाही. फोन गाडीत होता, मी बाहेर होतो. नंतर तुमचा फोन आल्याचे लक्षात येताच तुम्हाला संपर्क साधल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Dhananjay Munde - Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोजदादा, आणखी जातींबरोबर वैर घ्यायचे; ती भूमिका मराठाविरोधी नाही का? : बार्शीतील कार्यकर्त्याचा सवाल

शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे, तुम्ही सरसकट मदतीचे आश्वासन दिले आहे, तसा तुमचा निरोप आम्ही शेतकऱ्यांना देतो. (Dhnanjay Munde) पण मदतीला आठ दिवसही लागू देऊ नका, असे जरांगे पाटील यांनी मुंडे यांच्याशी बोलतांना सांगितले. मुंडे यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची तयारी सुरू असल्याचे सांगितले.

दहा दिवसात मदत देण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं नसतं, आम्हाला शेतकरी वाचवायचा आहे, याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com