Manoj Jarange Patil : मनोजदादा, आणखी जातींबरोबर वैर घ्यायचे; ती भूमिका मराठाविरोधी नाही का? : बार्शीतील कार्यकर्त्याचा सवाल

Barshi Anna Shinde's Flex : लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणले. पण, त्या खासदारांनी निवडून आणल्याची जाणीव ठेवली नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आपल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही.
Manoj Jarange Patil-Flex
Manoj Jarange Patil-FlexSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 September : मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून राज्य सरकारला वारंवार इशारा देणारे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनाच आता बार्शीतून आव्हान देण्यात आले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेले अण्णा शिंदे यांनी फ्लेक्सच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे 9 सप्टेंबरपर्यंत द्यावीत; अन्यथा बार्शीच्या शिवसृष्टीत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महायुती सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याने महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पडले. पण, आरक्षणाचा प्रश्न त्यानंतरही कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) मराठा समाजाची फसगत होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात गरजवंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात येईल, असा उल्लेख करण्याचे मान्य करून घ्या, अशी विनंती अण्णा शिंदे यांनी जरांगे पाटील यांना केला आहे.

एक मराठा-लाख मराठा या शीर्षकाखाली आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, आमच्या मनातील शंका दूर करतील का? असा सवाल करत अण्णा शिंदे (Anna Shinde) यांनी जरांगे पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलेला आहे.

Manoj Jarange Patil-Flex
Raosaheb Danve : दानवेंनी खोडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दावा; ‘भाजपचे नुकसान अजितदादांमुळे नव्हे; तर...’

मनोजदादा, महायुतीचे सरकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही; म्हणून आपण लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली.

लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणले. पण, त्या खासदारांनी निवडून आणल्याची जाणीव ठेवली नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आपल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही.

मनोजदादा आताही आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

दादा आपल्या भूमिकेमुळे गरजवंत मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल, यात शंका नाही.

मग दादा आपण भूमिका घेतली, तर ती महायुतीच्या विरोधात असणार आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार, हे मान्य आहे

दादा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना गरजवंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार, असे जाहीर करून घ्यावे

दादा, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किती दिवसात गरजवंत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार आहे, ते लिहून घ्यावे

दादा पूर्वी मुस्लिम-मराठा वाद रझाकराच्या काळात झाला, त्यानंतर मराठा-दलित वाद झाला. आता मराठ्यांचे 300 हून अधिक ओबीसी बरोबर वैमनस्य झाले. आपण आणखी किती जातींबरोबर वैर घ्यायचे, हेही ठरवा.

नाही तर दादा आपण एका देवेंद्र फडवणीस ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्यांचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेले महायुतीचे सरकार घालवून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीलाच मुख्यमंत्री करणार. मग ही आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधात दिसणार नाही का?

दादा, विधानसभा निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीने पुन्हा म्हणू नये की, आमच्या हातात काही नाही. आरक्षण मर्यादा वाढविण्याचे अधिकार केंद्राच्या हाती आहेत

अन्यथा दादा गरजवंत मराठ्यांची फसवणूक झाल्यावर या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार? त्याची जबाबदार निश्चित करा; अन्यथा आपल्यासहित कोणत्याही मराठा नेतृत्वावर गरजवंत मराठा विश्वास ठेवणार नाही.

Manoj Jarange Patil-Flex
Konkan Politics : तीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा

आदरणीय मनोजदादा तुम्ही आणि मी शंभूराजे युवा क्रांती संघटनेत एकत्र काम केलेले आहे. म्हणून माझ्या शंकांचे समाधान करा, अशी विनंती मी आपणास करत आहे. आपण माझ्या शंकांचे आठ दिवसांत समाधान केले नाही, तर येत्या 9 सप्टेंबरपासून बार्शीतील शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आंदोलन करणार आहे, असा इशारा अण्णा शिंदे यांनी दिला आहे

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com