Maratha Reservation News : गोदापात्र प्रतिकात्मक जलसमाधी ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Beed News : गोदावरी नदीपात्रात शेकडो समाज बांधवांनी उड्या घेत प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केले
Beed News
Beed News Sarkarnama

Maratha Andolan News : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरंगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलेल्या समाजबांधवांवर अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधाची धग जिल्ह्यात कायम आहे. रविवारीही गोदावरी नदीपात्रात शेकडो समाज बांधवांनी उड्या घेत प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची प्रतिकात्मक यात्राही काढण्यात आली. केज तालुक्यातील आडस, चंदन सावरगाव, कुंबेफळ येथे याच मुद्द्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जालन्यातील घटनेमुळे मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.

Beed News
Girish Mahajan News : जालन्यातील लाठीचार्जमुळे अडचणीत आलेल्या सरकारच्या मदतीला धावले पुन्हा 'संकटमोचक' गिरीश महाजन !

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी पोलीस (Police) आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलन जखमी झाले होते. लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांना अंबड उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Beed News
Shailesh Balkawade Jalna SP : तुषार दोशी सक्तीच्या रजेवर ; शैलेश बलकवडे जालन्याचे नवे 'एसपी'

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरू झालेल्या या संघर्षात सर्वच विरोधीपक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यात एसटी महामंडळाच्या बसेसची जाळपोळ आणि तोडफोड होण्याचे प्रकार पुढे आले आहेत. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत अनेक ठिकाणी रस्तारोखोही करण्यात आला आहे. सकल मराठा मोर्चाच्या वतीनेही जिल्हा स्तरावर आणि तालुकास्तरावर आंदोलनाची धग दिसत आहे. तसेच सोमवारी (ता. ४) अनेक शहरांमध्ये बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com