Shailesh Balkawade Jalna SP : तुषार दोशी सक्तीच्या रजेवर ; शैलेश बलकवडे जालन्याचे नवे 'एसपी'

Maratha Reservation : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरले आहे.
Shailesh Balkawade News
Shailesh Balkawade NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna Marathi Andolan News : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरले आहे. यामुळे राज्य सरकारने जालन्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. गृहविभागाने त्यांच्या सक्तीचा रजेच्या आदेश काढला आहे. त्यांच्या जागी आता शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बलकवडे यांनी रविवारी दुपारीच पदभार स्विकारला असल्याची माहिती मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी पोलीस (Police) आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलन जखमी झाली.

Shailesh Balkawade News
Tushar Doshi News : आंदोलकांना मारहाण करणं पोलीस अधीक्षकाच्या अंगलट ;गृहविभागाने पाठवलं सक्तीच्या रजेवर

या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. अंतरवली सरटीतील घटनेमुळे सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. तसेच विरोधकांनीही सरकारला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे राज्य सरकाने जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यांच्या जागी आता बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बलवकडे हे याआधी कोल्हापूरचे एसपी होते. त्यांची काही दिवसांपूर्वीच पुणे (Pune) येथील राज्य पोलीस दलाचे समादेशक म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र, जालन्यातील घटनेनंतर आता त्यांना पुन्हा जालना येथे एसपी म्हणून पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) म्हणाले होते, "मी तीन दिवसांपूर्वीच मनोज जरांगेंसोबत बोललो होतो. त्यांच्याशी बैठकाही झाल्या होत्या, त्यांच्या मागण्यांवर काम सुरू झाले होते. पण नको ती घटना घडली. या घटनेनंतर पोलीस अधिक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांच्यासोबतच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची बदली जिल्ह्याच्या बाहेर करण्यात आली आहे,"

Shailesh Balkawade News
Pandharpur Band : फडणवीस राजीनामा द्या; अन्यथा पंढरपुरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ उधळून लावू , मराठा समाजाचा इशारा

"उद्या (सोमवारी) मुंबईतून वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेची चौकशी करण्यासाठी जालन्यात येणार आहेत. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, कोणालाही पाठीशी घालणार नाही. या घटनेत राजकारण करू नये, आंदोलकांनी राजकीय पोळी भाजणाऱ्यांच्या बळी पडू नका, हे सरकार तुमचे आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com