Aurangabad Central Constituency 2024 : जयस्वाल-तनवाणी-इम्तियाज? `मध्य` मध्ये पुन्हा योग जुळला ? विजयाचा गुलाल कोण उधळणार ?

Imtiaz Jaleel News: इम्तियाज जलील यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या संदिपान भुमरे यांच्याकडून पराभव झाला. मात्र शहरातील मध्य आणि पूर्व या विधानसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांना निवडून आलेल्या संदिपान भुमरे यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य होते.
Aurangabad Central Assembly Constituency
Aurangabad Central Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Constituency 2024 : विधानसभेच्या शहरातील `मध्य` मतदार संघात शिवसेनेने विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना मैदानात उतरवले आहे.

2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली तेव्हा प्रदीप जयस्वाल शिवसेनेकडून तर किशनचंद तनवाणी यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. हिंदुत्ववादी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्यामुळे या मतदारसंघात एमआयएमचा उदय झाला होता.

पंधरा दिवसात उमेदवारी आणि प्रचार करत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या मतदारसंघात पक्षासाठी पहिला विजय मिळवला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशाच पद्धतीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मत विभाजन झाले आणि त्याचा फायदा पुन्हा एमआयएम ला झाला.

आमदारकीची टर्म संपत नाही तोच इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेवर निवडून गेले. आता 2024 मध्ये मध्य मतदारसंघात पुन्हा हाच योग जुळून येतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

इम्तियाज जलील यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या संदिपान भुमरे यांच्याकडून पराभव झाला. मात्र शहरातील मध्य आणि पूर्व या विधानसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांना निवडून आलेल्या संदिपान भुमरे यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य होते.

या जोरावर इम्तियाज जलील मध्य विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तिकडे शिवसेनेकडून आमदार प्रदीप जयस्वाल तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तनवाणी निवडणूक रिंगणात असणार आहेत.

Aurangabad Central Assembly Constituency
Imtiaz Jaleel Met Manoj Jarange Patil : निवडणुकीचा बिगुल वाजताच इम्तियाज जलील अंतरवालीत धडकले

इम्तियाज जलील यांची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर झाली तर 2014 मध्ये झालेल्या तिरंगी लढतीचा `रिकॅप` या वेळीही पहायला मिळेल. विशेष म्हणजे जशी राजकीय परिस्थिती 2014 मध्ये होती तशीच दहा वर्षानंतर निर्माण झाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आणि विशेषता मराठवाड्यात महायुती सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे. त्यातच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काही मतदारसंघात थेट उमेदवार देणार आहेत. अशा वेळी मध्य मतदारसंघात जरांगे पाटील यांनी उमेदवार दिला तर इम्तियाज जलील यांचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो. त्याचे कारण म्हणजे इम्तियाज जलील यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची घेतलेली भेट.

कदाचित या भेटीत मध्य विधानसभा मतदारसंघात थेट मदत करता आली नाही तर किमान उमेदवार द्यावा, अशी विनंती इम्तियाज जलील यांनी केली असावी, अशी चर्चा आहे. मतदारसंघ पुनर्रचना झाली त्यानंतर 2009 मध्ये मध्य विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला.

Aurangabad Central Assembly Constituency
MLA Pradeep Jaiswal On CM Shinde : आधी निधीच मिळत नव्हता, आता अकरा महिन्यातच अडीचशे कोटी..

जरांगे पाटील उमेदवार देणार का?

या मतदारसंघातील पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर प्रदीप जयस्वाल अपक्ष निवडून आले होते. शिवसेनेच्याच विकास जैन यांचा त्यांनी पराभव केला होता. निवडून आल्यानंतर काही महिन्यातच प्रदीप जयस्वाल यांची शिवसेनेत घरवापसी झाली.

विद्यमान आमदार असल्यामुळे 2014 मध्ये युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जयस्वाल यांनाच उमेदवारी दिली. मात्र मत विभाजन होऊन शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना फटका बसला. इम्तियाज जलील यांच्या मध्य मधील पहिल्या विजयाने शहरात आणि त्यानंतर जिल्ह्यात एमआयएम ने आपली ताकद वाढवली.

महापालिकेत विरोधी पक्ष आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत थेट विजयाला गवसणी घालत एमआयएम ने इतिहास घडवला. सध्या पक्षांतर्गत गटबाजी आणि सोबतीला एकही मित्र पक्ष येत नसल्याने अडचणीत सापडलेल्या एमआयएम ला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आधार वाटू लागला आहे.

Aurangabad Central Assembly Constituency
Manoj Jarange Patil Video : 'इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम करणार', मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

या पार्श्वभूमीवर मध्य विधानसभा मतदारसंघात काय घडेल हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. तरीही लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयाचा काही परिणाम विधानसभेला होतो का? हे 23 नोव्हेंबर च्या निकालानंतर स्पष्ट होईल. तूर्तास अनेक वर्षे एकाच पक्षात काम करणाऱ्या आणि केवळ राजकीयच नाही तर व्यावसायिक मित्र असलेल्या जयस्वाल आणि तनवाणी यांच्यात मध्ये आमदारकीसाठीची लढत रंगणार एवढे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com