
Sanjay Raut book controversy : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग पुस्तकाच्या प्रकाशनपूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याविषयी केलेल्या दाव्याने राज्यातील महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांच्या दाव्याचा चांगलाच समाचार खोचक प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये महामोर्चात सहभागी झालेल्या युवासेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांच्या पुस्तकाचं उद्या मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. प्रकाशनापूर्वी माध्यमांच्या हाती हे पुस्तक लागलं आहे. राऊत यांच्या पुस्तकातील भाजपचे (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याविषयी केलेल्या दाव्याच्या वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकले. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं. असे असताना हे पुस्तक आदित्य ठाकरेंनी अजूनही वाचलं नसल्याचं देखील समोर आलं आहे. तशी त्यांनीच याबाबत प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरे म्हणाले, "संजय राऊत (Sanjay Raut) लिखित 'नरकातला स्वर्ग', पुस्तकाचं उद्या अनावरण होत आहे. अनावरण झाल्यानंतर सगळे हे पुस्तक वाचतील. अजून तरी मी पुस्तक वाचलेलं नाही. उद्या अनावर झाल्यावर वाचेल". संजय राऊत असेल किंवा सुरेश चव्हाण असेल, पक्षासाठी ते जेलमध्ये गेले आहेत. त्यांनी ते भोगलं आहे. उद्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यामधील सर्व काही उघड होईल, सर्वांना दिसेल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
ज्यांनी पैसे खाल्ले असतील, ते भाजपच्या वाशिंग मशीन मध्ये गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला जसं महाराष्ट्रात वाढवलं, किंवा पाठिंबा दिला, त्याच भाजपने त्याच परिवाराला तोडलं आहे, हा प्रकार दुर्दैवी आहे आणि नीचपणा देखील आहे, असा ठाकरी प्रहार देखील आदित्य ठाकरेंनी भाजपवर केला.
एवढे घाणेरडे राजकारण कधी या देशाने पाहिलं नव्हतं, दुसऱ्या देशाने देखील पाहिलं नाही, हेच घाण राजकारण भाजप आता पाच-सहा वर्षात किंवा दहा वर्षात करू लागला आहे, असा घणाघात देखील आदित्य ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांनी मध्यंतरी एकमेकांना टाळी दिली होती. यानंतर राज्याच्या राजकारण ठाकरे बंधू एकत्र येणार, अशा चर्चांनी जोर धरला होता. त्यावर आदित्य ठाकरे यांनी उद्धवसाहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणी सोबत येतील साफ मनाने येतील, त्यांना आम्ही पुढे घेऊन चालला तयार आहोत, असं सांगितलेलं आहे, याचा पुनरुच्चार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.