Sharad Pawar NDA entry : शरद पवारांना 'NDA' मध्ये येण्यासाठी रामदास आठवलेंचा अटलबिहारी सरकारचा दाखला!

Ramdas Athawale Reacts to Sharad Pawar Possible NDA Entry in Ahilyanagar Shirdi : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची शिर्डीत पत्रकार परिषद झाली.
Sharad Pawar NDA entry
Sharad Pawar NDA entrySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political news : शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची राज्यात चर्चा आहेत. महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमधील नेते देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सूचक बोलत आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत प्रतिक्रिया दिली.'शरद पवार यांनी 'NDA' मध्ये यायला काही हरकत नाही. समाजवादी विचारांचे अनेक नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात 'NDA' मध्ये आले होते', असा दाखला यावेळी रामदास आठवले यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डी (Shirdi) इथं आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताचं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकला प्रत्युत्तर, शरद पवार-अजित पवार एकत्र येण्यासह राज्यासह देशातील विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले.

Sharad Pawar NDA entry
Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : '...तर मुंबईतील भूखंड घोटाळ्यावर वेगळं पुस्तक'! मंत्री विखेंचा शिवसेनेला खोचक टोला

रामदास आठवले म्हणाले, "शरद पवार (Sharad Pawar) 'NDA' सोबत येतील असे मला वाटत नाही. मात्र त्यांनी 'NDA' सोबत आले पाहिजे. समाजवादी विचारांचे अनेक नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात 'NDA'मध्ये दाखल झाले होते. शरद पवारांनी देखील यायला काहीच हरकत नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, तर राष्ट्रवादी आणखी मजबूत होईल".

Sharad Pawar NDA entry
Marathi Language: अभिजात दर्जा मिळाला पण, मायभूमीतच मराठी ठरतेय अडचणीची? दहावीत 38 हजार विद्यार्थी नापास

जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला देशाच्या अस्मितेला धक्का होता. आपल्या सैन्याने आॅपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातले आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आपण टिपून-टिपून आतंकवादी मारले. नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कणखर भूमिका घेतली. ही युद्धबंदी म्हणजे अल्पविराम आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताला मिळावा ही आपली भूमिका असून, POK ताब्यात घ्यायलाच हवा, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

पंडित नेहरूंनी POK ताब्यात घ्यायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. मोदींच्या नेतृत्वात आपण सक्षम आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले म्हणून युद्ध थांबवलेले नाही.POK ताब्यात घेण्यासाठी युद्ध गरजेचे असले, तरी आम्ही बुद्धाला मानणारे आहोत. स्वतःच्या संरक्षणासाठी युद्ध करणे हिंसा नसते, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com