Ambadas Danve News : ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचं थेट निवडणूक आयुक्तांना पत्र; म्हणाले,'मोदींच्या सभेसाठी...'

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात येत असून स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहृीर करण्यात आला असून लोकसभा निवडणूक 2024 चे कामकाज सुरु झाले आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे, असे असताना प्रभारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठया प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात येत असून स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठया प्रमाणात खर्च करण्यात येत आहे.

एकप्रकारे हा निवडणूक आयोगाने (Election Commison) जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार उचित कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. (Ambadas Danve News )

Ambadas Danve
Uddhav Thackeray News : येत्या 4 जूनला भाजपमध्ये फूट पडणार; नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याप्रमाणे राज्यात सर्वत्र राजकीय पक्षांकडून त्यांचे पालन करुन नेत्यांच्या सभा सुरु असून चौथ्या टप्यातील प्रचाराची कामे सुरु आहेत. परंतु देशाचे पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या वेळी अनेक ठिकाणी या आचारसंहितेचा भंग करुन ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. त्या ठिकाणी मोठया प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात आली.

स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदीजी येणार असल्याने विमानतळापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी व स्वच्छतेची कामे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वास्तविक पाहता इतरवेळी देशाचे पंतप्रधान किंवा इतर राजकीय महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी अशी कामे करण्यात येत असतात. परंतु लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशात आदर्श आचारसंहिता सुरु असताना नरेंद्र मोदी यांच्या बैठकांच्या स्थळी जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अशी कामे शासकीय यंत्रणेचा वापर करुन करण्यात येत असल्याने एकप्रकारे हा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे.

त्यामुळे याप्रकरणी चौकशी करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार उचित कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी मुख्य निवडणुक आयुक्त यांच्याकडे केली आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

Ambadas Danve
Ambadas Danve News : 'ईव्हीएम' हॅक करण्यासाठी अडीच कोटी द्या,पाहिजे तसा निकाल...; अंबादास दानवेंकडे कुणी केली मागणी?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com