Lok Sabha Election 2024 : ...अखेर महायुतीच्या प्रचारात अब्दुल सत्तार अवतरले !

Political News : आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेपासून अंतर राखून असलेले शिवसेनेचे राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार या कार्यक्रमात अवतरले. त्यांचीही अचानक उपस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
bhagvat karad, sandippan bhmumre
bhagvat karad, sandippan bhmumre Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप जाहीर झाले नसले तरी संभाजीनगर येथील प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजन कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींची हजेरी होती. विशेष म्हणजे आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेपासून अंतर राखून असलेले शिवसेनेचे राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार या कार्यक्रमात अवतरले. त्यांचीही अचानक उपस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनाचा मान जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandippan Bhumre) यांना देण्यात आला. त्यामुळे लोकसभेची उमेदवारी भुमरे यांनाच मिळणार याचे संकेत मिळत असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. लोकसभा निवडणुकीचा राज्यातील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे. 26 एप्रिल रोजी मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 7 आणि 13 मे अशा दोन टप्प्यांमध्ये उर्वरित पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. (lok Sabha Election 2024 )

bhagvat karad, sandippan bhmumre
Lok Sabha Election 2024 : उद्यापासून चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया होणार सुरू; पुण्यासह 'या' 11 मतदारसंघांचा समावेश

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे स्तंभ पूजन करत खऱ्या अर्थाने आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुतीची जागा शिवसेना लढवणार की भाजप? याचा फैसला अजून झालेला नाही. दोन्ही पक्षांनी जागेवर दावा करत महायुतीचा उमेदवार निवडून आणणार, अशी ग्वाही दिली आहे. या पार्श्वभूमीवर स्तंभ पूजनाच्या कार्यक्रमात महायुतीच्या जिल्ह्यातील शिवसेना, भाजप दोन्ही पक्षाचे नेते आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी आवर्जून उपस्थित होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील कार्यक्रमात सहभागी होताना दिसले. सत्तार यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावून गेली. लोकसभा निवडणूक म्हटले की, अब्दुल सत्तार यांची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष असते. परंतु या वेळी कुठल्याच निर्णय प्रक्रियेत किंवा उमेदवार ठरवण्याच्या बैठकांमध्ये सत्तार यांचा सहभाग नव्हता.

मध्यंतरी प्रकृती बरी नसल्यामुळे ते विश्रांती घेत होते. परंतु पुन्हा सक्रिय झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराबद्दल त्यांनी फारशी उत्सुकता किंवा रस दाखवला नव्हता. मात्र, महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले. स्तंभपूजनाचा मान संदीपान भुमरे यांना मिळाल्यामुळे आज तरी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा उमेदवार म्हणून होते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भुमरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये त्याचे पडसाद काय उमटतात ? यावरही येणाऱ्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमात भाजपाचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री व संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेले डॉ. भागवत कराड व भाजपचे सर्व मंत्री, आमदार पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. एकंदरीत त्यांच्या देहेबोलीवरून संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आल्याचे जाणवत होते.

नुकत्याच नागपूर येथे झालेल्या फडणवीसांच्या भेटीत कराड, सावे आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांना संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आल्याची कल्पना देण्यात आली होती. परंतु महायुतीचा उमेदवार म्हणून शिंदे गटाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी शक्ती पणाला लावा, असे आदेश फडणवीस यांनी देत या त्रिकुटाला माघारी धाडले होते. त्यामुळे स्तंभपूजनाच्या कार्यक्रमात महायुती एकसंध असल्याचे चित्र सध्या तरी दिसून आले आहे.

महायुतीमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे लोकसभा निवडणूक महायुती प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन करण्यात आले. या प्रसंगी मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, मंत्री भागवत कराड, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, आमदार रमेश बोरणारे, आमदार प्रशांत बंब, आमदार विक्रम काळे, माजी आमदार कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, शिरीष बोराळकर तसेच सर्व महायुतीमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited By : Sachin Waghmare)

R

bhagvat karad, sandippan bhmumre
Ambadas Danve On Sandipan Bhumre : तुमची अगरबत्ती मध्येच कुठे ओवाळतायं ? मराठा समाज तुम्हालाच घरी बसवणार; भुमरेंना दानवेंचा टोला..

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com