Abdul Sattar News : पालकमंत्री पदासाठी अब्दुल सत्तार इच्छुक; मुख्यमंत्र्यांचा निर्णय...

Abdul Sattar Eknath Shinde : अब्दुल सत्तार यांनी भाजपची खिल्ली उडवली. जिल्ह्यात आमचा एक खासदार पाच आमदार आहेत. पालकमंत्रीपद शिवसेनेकडे असल्यामुळे भाजप या पदावर दावाच करू शकत नाही.
Abdul Sattar Eknath Shinde
Abdul Sattar Eknath Shindesarkarnama

Abdul Sattar News : महायुतीचे संदीपान भुमरे लोकसभेवर निवडून गेल्यापासून जिल्ह्यात पालकमंत्री कोण होणार? यावर चर्चा सुरु आहे. त्यांच्या जागी पालकमंत्री कोण होणार? यावरून शिवसेना (शिंदे गट) स्पर्धा सुरू असताना अचानक भाजपने या पदावर दावा सांगितला आहे.

यावर राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपची खिल्ली उडवली. जिल्ह्यात आमचा एक खासदार पाच आमदार आहेत. पालकमंत्रीपद शिवसेनेकडे असल्यामुळे भाजप या पदावर दावाच करू शकत नाही. शेवटी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे सांगत सत्तार यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली.

भुमरे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कामाचे बक्षिस म्हणून पालकमंत्री पद अतुल सावे यांना द्यावे, अशी मागणी शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केणेकर व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली होती. यावर विचार करू, असा दोनच शब्दात फडणवीसांनी हा विषय उडवून लावला. पण पालकमंत्री पदाची चर्चा काही थांबत नाहीये.

Abdul Sattar Eknath Shinde
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंचे खासदार काळेंना ओपन चॅलेंज, 'मी 5 हजार कोटींची रस्ते केले, तुम्ही एक करून दाखवा'

अब्दुल सत्तार Abdul Sattar यांनी आपल्याला पालकमंत्री होण्याची इच्छा आहे, इच्छा कोणाला नसते? पण शेवटी याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे सांगत भाजपचा दावा चुकीचा असल्याचे माध्यमाशी बोलतांना म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पश्चिमचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट हे पालकमंत्री पदासाठी इच्छूक आहेत.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर शिरसाट यांचा नंबर लागू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्याने मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांची शिंदेंची Eknath Shinde डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

तुर्तास शिरसाट, सत्तार या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठरवतील ते मान्य असेल, असे म्हटले आहे. भाजपच्या दाव्यावर स्वतः फडणवीस हेच फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भाजपचा सूरही या विषयावरून काहीसा नरमल्याचे चित्र आहे.

(Edited By Roshan More)

Abdul Sattar Eknath Shinde
Vidhan Sabha Election : विधानसभेचं संख्याबळ 288 वरून 276 वर; 12 जागा रिक्त!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com