Vidhan Sabha Election : विधानसभेचं संख्याबळ 288 वरून 276 वर; 12 जागा रिक्त!

Maharashtra Assembly Member : पाच वर्षांत विधानसभा काही आमदारांचं निधन झालं तर लोकसभा निवडणुकीसाठी काहींनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राज्यातील विधानसभेच्या 12 जागा रिक्त झाल्या आहेत.
MLA
MLASarkarnana

Maharashtra Political News : गेल्या पाच वर्षांत विधानसभा सदस्यांचं झालेलं निधन आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी व त्यानंतर सदस्यांनी दिलेले राजीनामे यामुळं महाराष्ट्र विधानसभेच्या 12 जागा रिक्त झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत 09 आमदारांचं निधन झालं तर 09 जणांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

चंद्रकांत जाधव (काँग्रेस - कोल्हापूर उत्तर - कोल्हापूर), रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस - देगलूर - नांदेड), भारत भालके (राष्ट्रवादी - पंढरपूर - सोलापूर), रमेश लटके (शिवसेना - अंधेरी पूर्व - मुंबई), लक्ष्मण जगताप Laxman Jagtap (भाजप - चिंचवड- पुणे), मुक्ता टिळक (भाजप - कसबा पेठ - पुणे), अनिल बाबर (शिवसेना शिंदे गट - खानापूर - सांगली), गोवर्धन शर्मा (भाजप - अकोला पश्चिम - अकोला) आणि पी. एन. पाटील (काँग्रेस - करवीर - कोल्हापूर) या 09 आमदारांचं निधन झालं.

त्यापैकी कोल्हापूर उत्तर, देगलूर, पंढरपूर, अंधेरी पूर्व, चिंचवड आणि कसबा पेठ या 06 मतदारसंघांत पोटनिवडणुका लागल्या मात्र खानापूर, अकोला पश्चिम आणि करवीर या 03 मतदारसंघांत अद्याप तरी पोटनिवडणुका लागल्या नाहीत.

पंढरपुरात राष्ट्रवादीचा तर कसब्यात भाजपचा पराभव

कोल्हापूर उत्तर आणि देगलूर येथे लागलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पुन्हा जिंकली. कोल्हापूर उत्तर येथे जयश्री जाधव तर देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर निवडून आले. पंढरपूर येथे भाजपचे समाधान औताडे जिंकून आले तर अंधेरी पूर्व येथे शिवसेना ठाकरे गटाच्या तसेच दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडून आल्या.

चिंचवडमध्ये भाजपच्या तसेच दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या तर कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर जिंकले. कोल्हापूर उत्तर आणि देगलूर या दोन्ही जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवल्या. पंढरपूरची जागा राष्ट्रवादीनं गमावली तर भाजपनं मिळवली. अंधेरी पूर्वची जागा ठाकरे गटानं तर चिंचवडची जागा भाजपनं कायम राखली. कसब्याची जागा मात्र भाजपनं गमावली तर काँग्रेसनं जिंकली.

MLA
Sangli Politics : सांगली महाविकास आघाडीत ठिणगी; आधीच काँग्रेस-शरद पवार गटात धुसफूस; आता ठाकरे गटाने तेल ओतले

अशोक चव्हाणांसह 09 आमदारांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीत उभ्या राहिलेल्या एकूण 12 आमदारांपैकी 7 आमदार खासदार बनले. वर्षा गायकवाड (धारावी), प्रणिती शिंदे Praniti Shinde (सोलापूर शहर मध्य), प्रतिभा धानोरकर (वरोरा), बळवंत वानखेडे (दर्यापूर), नीलेश लंके (पारनेर) आणि रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व) आणि संदीपान भुमरे (पैठण) हे आमदार खासदार झाले. खासदार झाल्यानं या सर्वांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला.

राजू पारवे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत रामटेक लोकसभा लढवली. त्याआधी त्यांना उमरेड विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. तर अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांनी भोकर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळं विधानसभेच्या एकूण 9 जागा रिक्त झाल्या.

एकूणच काय तर पोटनिवडणुका न लागल्यानं खानापूर, अकोला पश्चिम आणि करवीर या 03 जागा तर विधानसभा सदस्यांनी राजीनामा दिल्यानं 09 जागा अशा एकूण 12 जागा रिक्त झाल्या आहेत. दोन - अडीच महिन्यांत विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता असल्यानं या 12 जागांवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळं विधानसभेचं सध्याचं संख्याबळ घटून ते 288 वरून 276 वर आलं आहे.

MLA
Pune Vidhan Sabha : पुण्यातील विधानसभेच्या सहा जागांवर दावा; ठाकरे गटाचे नेमके गणित काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com