Prashant Bamb On Abdul Sattar : केसाने गळा नाही कापला, त्यांनीच स्वतःचा गळा आवळून घेतला; सत्तारांना काहीच माहीत नाही...

Abdul Sattar BJP row : काही नेत्यांना आपल्या मुलाला, पुतण्याला अध्यक्ष करायचे होते. सगळी पदं घरातच पाहिजे, या हट्टातून त्यांनी युती तोडली, अशी टीका प्रशांत बंब यांनी केली आहे.
Prashant Bamb, Abdul Sattar
Prashant Bamb, Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena-BJP News : शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरून काल काही दावे केले होते. भाजपाने दोन्ही पदावर बिनविरोध वर्चस्व मिळवल्याने सत्तार यांनी 'भाजपाने केसाने गळा कापला, आमचा विश्वासघात केला' असा आरोप केला होता. या आरोपाला भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी प्रत्युत्तर दिले.

'अब्दुल सत्तार हे या प्रक्रियेत सुरूवातीपासून कुठेही नव्हते, त्यांना शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, काय ठरले याची काहीही माहिती नाही. ते दोन दिवसांपूर्वी या प्रक्रियेत आले. त्यामुळे आम्ही त्यांचा केसाने गळा कापला नाही, तर त्यांनी स्वतःच आपला गळा दाबून घेतला', अशा शब्दांत बंब यांनी सत्तार यांना सुनावले.

आमचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेला पहिले अडीच वर्षे अध्यक्षपद देण्याचे मान्य केले होते, असेही सत्तार यांनी धादांत खोटे सांगितले. अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत ठरला होता. याचे साक्षीदार शिवसेनेचे पालकमंत्री, जिल्ह्यातील आमदार, खासदार भुमरे व आमचे नेते आहेत, असे बंब म्हणाले.

Prashant Bamb, Abdul Sattar
Supreme Court news : कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच! सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, आता ‘तारीख पे तारीख’ नाही...

काही नेत्यांना आपल्या मुलाला, पुतण्याला अध्यक्ष करायचे होते. सगळी पदं घरातच पाहिजे, या हट्टातून त्यांनी युती तोडली. मुलगा की पुतण्या? यावरून त्यांच्यातच भांडणे झाली, त्यांच्यातच एकमत झाले नाही आणि त्यातूनच त्यांनी केलेले सगळे प्रयत्न, प्रयोग फसले. तोंडावर आपटल्याने कोणत्या तोंडाने अर्ज दाखल करावे, या विवंचनेतूनच शिवसेनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकला, असा आरोपही प्रशांत बंब यांनी केला.

राज्याच्या राजकारणारवर याचा परिणाम होईल, अशी धमकीही अब्दुल सत्तार यांनी दिल्याचे मी ऐकले. पण अशा धमक्यांना भाजपा भीक घालत नाही. राज्यात आम्ही एकत्र काम करतो, इथे कोणाला तरी आपल्या मुलाला, पुतण्याला अध्यक्ष करायचे म्हणून त्यांनी आमच्याच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी हातमिळवणी केली. गोव्याला सहलीला गेले, अशी टीका बंब यांनी केली आहे.

Prashant Bamb, Abdul Sattar
Mamata Banerjee News : निवडणुकीआधीच ममतादीदींचे 75 आमदार फिक्स; 'हा' फॅक्टर ठरणार गेमचेंजर, भाजपसमोर मोठे आव्हान

तुमच्याशिवाय आमचे गणित जुळते, पण युती म्हणून तुम्हाला उपाध्यक्ष पद द्यायला तयार आहोत, हे आम्ही शेवटपर्यंत सांगत होतो. पण त्यांनी ऐकले नाही, शेवटी आम्हाला आमच्या पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची वेळ असताना आम्ही माघार कशी घेणार? असा सवालही प्रशांत बंब यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com