Abdul Sattar-Imtiaz Jaleel News : अब्दुल सत्तार-इम्तियाज जलील भेटले,आलिंगन देत केल्या कानगोष्टी

Chhatrapati Sambhajinagar Loksabha ELection 2024 : शिवसेना शिंदे गटाला संभाजीनगरची जागा सुटली आणि जाहीर झालेला उमेदवार मंत्री सत्तार यांना मान्य नसला तर ते वेगळी भूमिका घेऊ शकतात, हे वेगळं सांगायला नको.
Abdul Sattar-Imtiaz Jaleel News
Abdul Sattar-Imtiaz Jaleel NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणूक जाहीर झाली, महाविकास आघाडी, एमआयएम, वंचितने उमेदवार जाहीर केले. महायुतीच्या बैठकावर बैठका सुरू आहेत, पण अजून संभाजीनगरचा उमेदवार ठरत नाहीये. या सगळ्या घडामोडीपासून अंतर राखून असलेले राज्याचे अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार हळुहळु सक्रिय होऊ लागले आहेत. नुकतीच त्यांची एमआयएमचे विद्यमान खासदार आणि दुसऱ्यांदा लोकसभा लढवत असलेले इम्तियाज जलील यांची भेट झाली.

दोघांनी एकमेकांना आलिंगन देत शेजारी बसून कानगोष्टीही केल्या. महायुतीचा उमेदवार अजून ठरायचायं आणि इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची झालेली भेट आणि त्यांच्यातच झालेल्या कानगोष्टीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कन्नडचे माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या मुलाचा विवाह सोहळा काल पार पडला.

Abdul Sattar-Imtiaz Jaleel News
Raver loksabha : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाने शरद पवार नाराज? मोठ्या नेत्याने सांगितली 'अंदर की बात'

या लग्नाला राजकीय नेते मंडळींची मोठी गर्दी होती. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत, शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी या लग्नाला हजेरी लावत वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी उदयसिंह राजपूत यांनी इम्तियाज जलील यांना मारलेली मिठी, अब्दुल सत्तार Abdul Sattar आणि इम्तियाज जलील यांच्यात झालेल्या कानगोष्टी याची चर्चा या सोहळ्याच्या ठिकाणी चांगलीच रंगली होती.

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या घडामोडीपासून लांब असलेले अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सक्रीय होतील, असे बोलले जाते. गेल्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यात आपलाही वाटा होता, असे जाहीरपणे सांगणारे अब्दुल सत्तार यावेळी नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यातच लग्न सोहळ्याच्या निमित्ताने का होईना सत्तार-इम्तियाज जलील ऐकमेकांना भेटल्याने दोघांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निश्चितच असणार आहे. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांना दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

शिवसेना शिंदे गटाला संभाजीनगरची जागा सुटली आणि जाहीर झालेला उमेदवार मंत्री सत्तार यांना मान्य नसला तर ते वेगळी भूमिका घेऊ शकतात, हे वेगळं सांगायला नको. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट Sanjay Shirsat यांनी केलेल्या दाव्यानूसार आज संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवाराची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अब्दुल सत्तार पूर्णपणे सक्रीय होतील, असे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com