Sanjay Shirsat News : संजय शिरसाटांनी महाजनांना शेलक्या शब्दात सुनावले; म्हणाले, 'शेपटीला चिंधी बांधून...'

Girish Mahajan And Nashik : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत निर्माण झालेल्या तेढ वाढतच चालल्याचे दिसते.
Girish Mahajan, Sanjay Shirshat
Girish Mahajan, Sanjay ShirshatSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघावरून निर्माण झालेल्या तिढा सुटताना दिसत नाही. यात भाजप-शिंदे गट-अजित पवार गटातील नेत्यांच्या विधानांनी त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच भाजप नेते, मंत्री गिरीश महाजनांनी नाशिक लोकसभा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केली. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी त्यांना सडेतोड उत्तर देत सुनावले आहे. Sanjay Shirsat News

नाशिकचे सिंटिंग खासदार शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse) आहेत. त्यांनी येथून त्यांनी दोन वेळा मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडेच असावी यासाठी गोडसेंसह शिंदे गटाच्या इतर नेत्यांनी आग्रह धरला आहे. तर केंद्रीय नेत्यांनी येथून राष्ट्रवादी अजित पवार गटाने लढण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केला आहे. त्यातच भाजपनेही नाशिकमध्ये मोठी ताकद असल्याचे सांगत भाजपचाच उमेदवार असावा, अशी मागणी लावून धरली आहे. पदाधिकाऱ्यांची मागणी चुकीची नाही, असे म्हणत महाजनांनी नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे म्हणाले. यावर शेपटीला चिंध्या बांधून महाजनांनी रामराज्यात आग लावू नये, अशा टोला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Girish Mahajan, Sanjay Shirshat
Buldhana Politics : काँग्रेसच्या नेत्याचं विधान अन् ठाकरे गटातील नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालं!

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, महायुतीत जागावाटपाचे कामकाज अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल. नाशिक जागेसाठी युतीतील तिनही पक्षांत रस्सीखेच आहे. तेथे सिटिंग खासदार शिवसेनेचा आहे, त्यामुळे त्यांचा नाशिकवर दावा आहे. छगन भुजबळांना पाठिंबा वाढत असल्याचे राष्ट्रवादीनेही तेथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर नाशिक लोकसभेत तीन आमदार भाजपचे आहेत. तर महानगरपालिकेत 70 नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपची मोठी ताकद असून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे, असे मतही त्यांनी व्यक्तक केले. महाजनांच्या या विधानाचा शिरसाटांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, गिरीश महाजन हे संकटमोचक आहेत. ते शेपटीला चिंधी लावून लंका जाळण्यासाठी असे काही उद्योग करतील. हे रामराज्य चांगले चालू द्या. चांगले चाललेले रामराज्य बिघवण्याचे काम त्यांनी करू नये. राज्यातील महायुती कायम टिकेल, यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, असा सल्लाही शिरसाटांनी महाजनांना दिला आहे. नाशिकबाबत महायुतीत काय तोडगा निघणार, ही जागा कुणाला मिळणार की साताऱ्याच्या बदल्यात येथून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लढणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Girish Mahajan, Sanjay Shirshat
Nashik Lok Sabha Constituency : शिंदे गट इरेला पेटला! नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शेवटपर्यंत लढणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com