Abdul Sattar Imtiyaz Jaleel : बडे मियाँ, छोटे मियाँ... सत्तारांनी दिली इम्तियाज यांच्या महोत्सवाला भेट

Lok Sabha Election : चर्चा मैत्रीची, चर्चा राजकारणाची अन् चर्चा निवडणुकीचीही...
Abdul Sattar, Imtiyaz Jaleel
Abdul Sattar, Imtiyaz JaleelSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Political News :

राजकारण आणि व्यक्तिगत मैत्री यातील फरक कळतो, तो राजकारणात यशस्वी होतो, असे म्हटले जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मैत्रीची चर्चा नेहमी होत असते. दोघांचे राजकीय पक्ष वेगळे आहेत आणि वैचारिक भूमिकेतही मोठी तफावत आहे. तरीही दोघांची मैत्री असल्याचे जिल्ह्यात याची चर्चा असते.

आता त्यांच्या मैत्रीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. याला निमित्त ठरले आहे ते इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी आयोजिलेल्या आय. जे. महोत्सवामुळे. या महोत्सवाला अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी हजेरी लावली. त्यामुळे राजकीय घडामोडींचीही चर्चा सुरू झाली आहे.

Abdul Sattar, Imtiyaz Jaleel
Political News : लोकसभेचे 'स्टेशन' दूरच; चव्हाण, कल्याणकर, चिखलीकरांमध्ये आधीच जुंपली

सत्तार-इम्तियाज जलील हे दोघे जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येतात तेव्हा एकमेकांचे कौतुक करताना थकत नाहीत. इम्तियाज जलील सत्तार यांचा उल्लेख नेहमीच 'मेरे बडे भाई' असा करतात. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर खासदार जलील यांनी आयोजिलेल्या आय. जे. महोत्सवात नुकतेच अब्दुल सत्तार गेले होते.

यंदाच्या महोत्सवात हजेरी लावणारे सत्तार हेच पहिले मोठे नेते असतील. गेल्या वर्षी या महोत्सवात सर्व पक्षांचे नेते, आमदार, खासदार आणि मंत्री आवर्जून गेले होते. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने कदाचित न जाण्याची राजकीय काळजी घेतली जात असावी, अशी चर्चा आहे.

अब्दुल सत्तार नेहमी उघडपणे इम्तियाज यांच्याशी असलेली मैत्री जपताना दिसतात. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा होता, असे जाहीर वक्तव्य सत्तार यांनी यापूर्वी केले आहे, तर इम्तियाज यांनीही सत्तार यांचे आपल्या विजयात असलेले योगदान मान्य केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'सत्तारभाई मेरे साथ है, और मुझे यकीन है वो मुझे कभी हारने नही देंगे,' हा इम्तियाज जलील यांचा दावा बराच बोलका ठरतो. इम्तियाज जलील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने इम्तियाज यांनी हा अशक्यप्राय विजय मिळवत इतिहास घडवला होता. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.

'वंचित'ने 'एमआयएम'ची साथ सोडली आहे, तर दुसरा कोणी त्यांची साथ द्यायला अद्याप तयार झालेला नाही. अशावेळी इम्तियाज जलील यांना पुन्हा लोकसभा जिंकायची असेल तर त्यांना मित्रधर्म पाळणाऱ्या मित्राची गरज आहे. अब्दुल सत्तार हे या व्याख्येत अगदी फीट बसतात. शिवाय मंत्री म्हणून सत्तार यांची जिल्ह्याच्या राजकारणातही चलती आहे.

छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटणार नाही, याचा अंदाज आल्यामुळे इम्तियाज यांच्या मदतीला सत्तार धावून येऊ शकतात, अशीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काल इम्तियाज जलील यांच्या आय. जे. महोत्सवात सत्तार यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. फूड फेस्टिव्हलमधील पदार्थांवर ताव आणि थंडीमध्ये गरमागरम चहाचे झुरके मारत, या बडे मियाँ, छोटे मियाँमध्ये राजकीय चर्चा झाली नसेल तर नवलच!

(Edited by Avinash Chandane)

R...

Abdul Sattar, Imtiyaz Jaleel
Maratha Aarakshan Mumbai Morcha : बाजरीची भाकरी, ठेचा अन् चटणी; मराठा आंदोलकासाठी खास न्याहारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com