Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील लढत आहेत. मनोज जरांगे व त्यांच्यासोबत ताकदीने उभा राहिलेला मराठा समाज काही वेळातच अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यासाठी आंदोलकांची तयारी पूर्ण झालेली आहे. या आंदोलकांसाठी अंतरवाली सराटी गावकऱ्यांनी खास न्याहारीचा बेत केला आहे.
मुंबईला जाण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच आसपासच्या गावातील लोकांनी अंतरवालीमध्ये मुक्काम ठोकला होता. या लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था गावकऱ्यांनी केली. आज सकाळी नियोजित वेळेनुसार नऊ वाजता मनोज जरांगे पाटील पदयात्रेने आपल्या हजारो मराठा बांधवांसह अंतरवलीतून निघणार आहेत. तत्पूर्वी येथे जमलेल्या मराठा बांधवांना बाजरीची भाकरी, ठेचा आणि चटणी असा नाश्ता गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला.
अंतरवालीतून निघण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे वाहन भगवे झेंडे आणि फुलांनी सजवण्यात आले आहे. पदयात्रेला सुरुवात करण्यापूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी माध्यमांशी ही संवाद साधला. पदयात्रेत सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांच्या वाहनांच्या रांगा अंतरवालीच्या दोन्ही बाजूने एक ते दोन किलोमीटरपर्यंत लागल्या आहेत. आता अंतरवालीमध्ये तीन ते चार हजार मराठा बांधव पदयात्रेत सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ही पदयात्रा निघण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. सधारणतः 11 नंतर ही पदयात्रा अंतरवालीतून सुरू होईल, असे सांगितले जाते. पदयात्रेत सहभागी होणाऱ्या मराठा (Maratha) बांधवांनी हातात भगवे झेंडे घेऊन मुंबईकडे निघण्याची जोरदार तयारी केली आहे. याशिवाय स्वयंसेवकांची टीम सुद्धा सज्ज झाली आहे. स्वयंसेवकांना ओळखपत्र काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि भगव्या टोप्या देण्यात आल्या आहेत. तसेच जरांगे पाटलांनी आंदोलकांना शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.