Abdul Sattar News : `लाडकी बहीण` योजनेच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तारांना झाली आदित्य ठाकरेंची आठवण..

Abdul Sattar mentioned the name of Aditi Tatkare as Aditya Thackeray. : महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आभार मानताना अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उल्लखे आदित्यची ठाकरे असा केला. विशेष म्हणजे हे नाव घेताना त्यांच्या हातात चिठ्ठी होती.
Abdul sattar-Aditi Tatkar-Aditya Thackeray News
Abdul sattar-Aditi Tatkar-Aditya Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना` राज्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आलेले अपयश येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धुवून टाकण्यासाठी सरकारने मारलेला हा मास्टर स्ट्रोक असल्याचे बोलले जाते. गेल्या महिनाभरापासून लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राज्यभरात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतले जात आहेत. विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता आठवडाभरात लागण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर भव्य असा लाडकी बहीण योजना मेळावा घेण्यात आला. पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा गर्दी जमवत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. पालकमंत्री म्हणून शहरात आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक करतांना दोन मिनिटांच्या भाषणात अब्दुल सत्तार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची आठवण झाली.

त्याचे झाले असे, की कार्यक्रमाला उपस्थितीत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आभार मानताना अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उल्लखे आदित्यची ठाकरे असा केला. विशेष म्हणजे हे नाव घेताना त्यांच्या हातात चिठ्ठी होती. तरी अब्दुल सत्तार यांनी चुकीचे नाव घेतल्याने याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. सत्तार यांच्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आदिती तटकरे जेव्हा आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर देखील सत्तारांनी केलेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दलचे हसू लपून राहिले नाही.

Abdul sattar-Aditi Tatkar-Aditya Thackeray News
Abdul Sattar News : मंत्री सत्तारांकडून वाटप करण्यात आलेल्या साड्यांची महिलांकडून होळी

महिला आणि बालविकास मंत्री म्हणून आमच्या भगिनी यांनी लाडकी बहीण योजनेला झुकते माप दिले, आणि राज्यातील बहिणीला कशाची कमी पडू दिली नाही, अशा आमच्या भगिनी आदित्यजी ठाकरे (Aditya Thackeray) यांचेही मी आभार मानतो, असे सत्तार घाईगडबडीत बोलून गेले. कार्यक्रमाची वेळ दुपारी बाराची होती, परंतु तो साडेतीन वाजता सुरू झाला. यामुळे गोंधळ उडालेल्या सत्तार यांनी आदिती तटकरे यांचा उल्लेख चक्क `आदित्यजी ठाकरे`, असा केला.

अब्दुल सत्तार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तार यांना राज्यमंत्री पद मिळाले होते. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम घेतले होते.

Abdul sattar-Aditi Tatkar-Aditya Thackeray News
Aditya Thackeray : "लाडकी बहीण योजनेचे पोस्टर बघितलं तरी इगो दुखावतोय..." आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

तेव्हापासून सत्तार यांच्या डोक्यात ठाकरे पिता-पुत्रांचे नाव फिट्ट बसले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच सरकारी कार्यक्रमात सत्तार यांच्या तोंडी चुकून का होईना ? आदित्य ठाकरे यांचे नाव आल्याची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com