Abdul Sattar News : कृषीमंत्री सत्तार जत्रेत रमले, रेवड्यांचीही केली खरेदी..

Marathwada : कुठल्याही पुढाऱ्यासाठी जनसंपर्क वाढवण्यासाठी अशा जत्रेत सहभागी होणे महत्वाचे असते.
Minister Abdul Sattar News
Minister Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राजकारणात आमदार, खासदार अगदी मंत्रीपदापर्यंत पोहचले तरी आपला साधेपणा आणि मतदारसंघातील लोकांशी असलेली नाळ कायम ठेवणारे नेते काही औरच. त्यात ग्रामीण भागातून निवडून गेलेला लोकप्रतिनधी असेल तर मग गावाकडची ओढ, तेथील पंरपरा, धार्मिक सोहळे, उत्सव यात तो अधिकच रमतो. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे त्यापैकीच एक.

Minister Abdul Sattar News
Bjp Foundation Day News : पक्ष सोडून गेलेल्या माजी अध्यक्षांना प्रदर्शनात स्थान नाही, तनवाणींचे पोस्टर हटवले..

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील धार्मिक उत्सव, सोहळे, यात्रांमध्ये सध्या सत्तार सहभागी होतांना दिसत आहेत. (Shivsena) चैत्र महिन्यात ग्रामीण भागात पारंपरिक यात्रा, उत्सवांची मोठी रेलचेल असते. (Marathwada) अनेक नागरिक हे यात्रेत आपले नवस फेडण्यासाठी येत असतात. या निमित्ताने जत्रा आणि मोठा बाजार देखील भरलेला असतो.

कुठल्याही पुढाऱ्यासाठी जनसंपर्क वाढवण्यासाठी अशा जत्रेत सहभागी होणे महत्वाचे असते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे त्यांच्या जनसंपर्कामुळे ओळखले जातात. त्यामुळे अशा जत्रा, ऊरुस, महोत्सव त्यांच्यासाठी पर्वणीच असते. आज मतदारसंघातील शिवना येथील श्री. शिवाई देवीच्या यात्रेत सत्तार सहभागी झाले होते.

शिवाई मंदीरात सदिच्छा भेट देत त्यांनी संस्थानच्या वतीने सत्कारही स्वीकारला. त्यानंतर ते जत्रेत फेरफटका मारायला गेले. तिथे लागलेल्या दुकांनाना भेटी देत त्यांनी विक्रेते आणि सर्वसामान्यांशी संवादही साधला. यात्रेत सर्वाधिक आकर्षण असते ते डाळ्या आणि रेवड्यांचे. या दुकाना पाहताच सत्तारांनी तिकडे धाव घेत डाळ्या, रेवड्यांचीही खरेदी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com