Abdul Sattar News : खासगी दौऱ्यात समीर वानखेडेंनी घेतली मंत्री अब्दुल सत्तारांची भेट...

Sameer Wankhede News : वाढत्या राजकीय भेटीगाठीमुळे ते राजकारणात उतरणार की काय? अशी चर्चा होऊ लागली आहे.
Abdul Sattar News
Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharahstra Political News : चित्रपट अभिनेता शाहरुख खान याच्या मुलावर ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे देशभरात प्रसिद्ध झालेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक तथा आयआरबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आज राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. (Abdul Sattar News) वानखेडे हे एका कार्यक्रमासाठी जळगावला जात होते.

Abdul Sattar News
Diwali Political News : राजकारणात एकमेकांवर चिखलफेक, वैयक्तिक भेटीत मात्र गळ्यात गळे...

दरम्यान, सिल्लोड येथे त्यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या संपर्क कार्यालयात त्यांची भेट घेत चर्चा केली. सत्तार यांनी वानखेडे यांचे स्वागत करत त्यांना मुलाच्या विवाहाचे निमंत्रणही दिले. विशेष म्हणजे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी नुकतीच शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच आज वानखेडे यांनी शिंदे गटाचे मंत्री सत्तार यांचीही भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maharashtra) राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या विरोधात मोहीम उघडली होती.

त्यावेळी शिवसेनेनेही मलिक यांच्या बाजूने उभे राहत वानखेडेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. असे असताना संजय राऊत यांची वानखेडे यांनी घरी जाऊन घेतलेली भेट सहज नव्हती एवढे मात्र निश्चित. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज वानखेडे यांनी अब्दुल सत्तार यांचीही भेट घेतली. काही दिवसांपूर्वी वानखेडे यांनी नागपुरात रेशीम बागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. त्यांच्या वाढत्या राजकीय भेटीगाठीमुळे ते राजकारणात उतरणार की काय? अशी चर्चा होऊ लागली आहे.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यावर ड्रग्जप्रकरणी कारवाई केल्यामुळे समीर वानखेडे प्रकाशझोतात आले होते. एका क्रूझ जहाजावर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थांचा वापर आणि ताब्यात घेण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मे २०२२ मध्ये खानवरील सर्व आरोप वगळण्यात आले, ब्लॅकमेलचा आरोप झाल्यानंतर वानखेडे यांना या प्रकरणातून काढून टाकण्यात आले. ८ सप्टेंबर रोजी वानखेडे यांना आर्यन खानशी संबंधित लाचखोरीच्या आरोपातून मुक्त करण्यात आले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com