Diwali Political News : राजकारणात एकमेकांवर चिखलफेक, वैयक्तिक भेटीत मात्र गळ्यात गळे...

MP Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्याकडून डाॅ. कराड, माजी खासदार खैरे यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल करण्यात आला आहे.
Diwali Political News
Diwali Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो म्हणूनच त्याला राजकारण म्हटले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात तर अलीकडे असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. (Diwali Political News) सरकारच्या विरोधात बेंबीच्या देठापासून बोंब ठोकणारे जेव्हा सत्तेसाठी त्यांच्याच गळ्यात गळे घालून फिरू लागतात तेव्हा मात्र सर्वसामान्यांना हसावे की रडावे? असा प्रश्न पडतो.

Diwali Political News
Manoj Jarange Patil News : ओबीसी नेत्यांनी ज्ञान पाजळणे बंद करावे, मराठ्यांच्या विरोधात बोलू नये...

राजकारणी मात्र याला संस्कृती, परंपरेचे दाखले देत आम्ही कशी राजकारणापलीकडची मैत्री, नाते जपतो याचे ढोल बडवत राहतात. (Marathwada) छत्रपती संभाजीगर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना-एमआयएम-भाजप हे आजच्या घडीला एकमेकांचे कट्टर विरोधक, वैरी म्हणून ओळखले जातात. एखाद्या विषयावर टीका करण्याची संधी येते तेव्हा कुठलाच नेता हातचे राखून बोलत नाही. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यात आघाडीवर आहेत.

विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळे त्यांना सर्वच राजकीय पक्षांवर मनसोक्त टीका करण्याची संधीही असते, पण याच इम्तियाज जलील यांच्याकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, (Dr.Bhagwat Karad) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबतचा एक फोटो समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला आहे. तिन्ही नेते एकमेकांच्या शेजारी उभे राहून हसताना दिसत आहेत.

यावर तुमचे राजकीय मतभेद असू शकतात, परंतु तरीही तुमचे एकमेकांशी चांगले संबंध असू शकतात. दिवाळीच्या पार्टीत तीन खासदार एकत्र येण्याचा एक सुंदर योगायोग, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. आदर्श पतसंस्था घोटाळ्यातील ठेवीदारांच्या मुद्द्यावरून मंत्री कराड आणि इम्तियाज जलील यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जुंपली आहे. बागेश्वर धाम यांच्या प्रवचन आणि दरबारावर कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या कराडांनी तोच पैसा आदर्शच्या ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी खर्च केला असता, तर त्यांची दिवाळी गोड झाली असती, अशा शब्दांत नुकताच निशाणा साधला होता.

तर शहरातील पाणीप्रश्नावरून शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कराड यांच्यासह त्यांच्या पक्षावर आणि इम्तियाज जलील यांच्या एमआयएमवर आरोप केले होते. शहरातील पाणीप्रश्नाचे पाप याच दोन पक्षांचे असल्याचे सांगत त्यांनी कराड, इम्तियाज यांना लक्ष केले होते. ही काही मोजकी उदाहरणं या तीन नेत्यांमधील राजकीय संबंध दर्शवण्यासाठी पुरेशी आहेत. मात्र, राजकारण आणि वैयक्तिक हितसंबंध यात बाधा न येऊ देतात ही मंडळी कशी एकत्र येतात हे त्यांचा उदो उदो करणाऱ्या समर्थकांनी ओळखलं पाहिजे. शहरातील एका उद्योजकांच्या घरी दिवाळी स्नेहमिलनासाठी दोन विद्यमान आणि एक माजी खासदार एकत्र आले होते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com