Abdul Sattar News : संभाजीराजे छत्रपती अन् इम्तियाज जलील यांना अब्दुल सत्तारांनी दिला 'हा' सल्ला!

Abdul Sattar Advice to Sambhaji Raje Chhatrapati and Imtiaz Jalil : विशाळगडावरील मशीद तोडफोड प्रकरणावरून सध्या कोल्हापूरसह राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.
Abdul Sattar advice to Sambhaji Raje Chhatrapati and  Imtiaz Jalil
Abdul Sattar advice to Sambhaji Raje Chhatrapati and Imtiaz JalilSarkarnama
Published on
Updated on

Vishalgad Encroachment Case :  विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक झालेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गाड्यांची तोडफोड, घरांवर दगडफेक आणि मशिदीची नासधूस झाल्यानंतर प्रकरण चांगलेच चिघळले. एमआयएमने मशिदीची तोडफोड झाल्याच्या निषेधार्थ 19 जुलै रोजी कोल्हापूरात मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.

तर विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी झालेल्या आंदोलकांच्या पाठीशी संभाजीराजे छत्रपती(Sambhaji Raje Chhatrapati) उभे राहिले आहेत. यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी दोघाना सबुरीचा सल्ला दिला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची दोन्ही नेत्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

Abdul Sattar advice to Sambhaji Raje Chhatrapati and  Imtiaz Jalil
Imtiyaaz Jaleel : विशाळगड अतिक्रमण प्रकरणी आता 'एमआयएम' मैदानात; कोल्हापुरात काढणार मोर्चा

विशाळगडावरील घटने संदर्भात अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांना विचारले तेव्हा त्यांनी मशिदीची किती नुकसान झाले हे तपासण्यासाठी वक्फ बोर्डाचे आयुक्त आणि सीईओ दोघेही जाणार आहेत. दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. कोणत्याही जाती धर्माची प्रार्थना स्थळे, मंदीरे ही सुरक्षितच राहिली पाहिजे असे सांगतानाच झालेल्या घटनेची चौकशी सरकार करणार आहे. यासाठी जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असे सत्तार यांनी सांगितले.

Abdul Sattar advice to Sambhaji Raje Chhatrapati and  Imtiaz Jalil
Imtiaz Jaleel on Sambhaji Raje Chhatrapati : 'संभाजीराजे छत्रपती हे खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का..? असा प्रश्न पडतो; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान!

दोन दिवसांपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. या दरम्यान तेथील एका मशिदीची आंदोलकांनी तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil ) यांनी महाविकास आघाडीसह राज्यातील महायुती सरकारवर टीका केलीे आहे.

Abdul Sattar advice to Sambhaji Raje Chhatrapati and  Imtiaz Jalil
Shahu Chhatrapati News : विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेवर शाहू छत्रपतींनी व्यक्त केली तीव्र नाराजी, म्हणाले...

तसेच मशिदीची तोडफोड झाल्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवरून शेअर करत घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील एमआयएमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी 19 रोजी कोल्हापूरात यावे, असे आवाहन केले आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवैसी यांनी ही घटना म्हणजे मशिदीवरील दहशतवादी हल्ला असल्याचे म्हणत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी मात्र संयमाची भूमिका घेत संभाजीराजे छत्रपती आणि इम्तियाज जलील यांना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com