Abdul Sattar : कृषीमंत्री पद गेल्यानंतरही अब्दुल सत्तार पुन्हा जर्मनी दौऱ्यावर; आताचं कारण काय ?

Germany Tour as Panan Minister : जागतिक बाजारपेठेसह शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, उत्पान क्षमतांसह इतर विषयांचा अभ्यास करणार
Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Political News : राज्याचे अल्पसंख्याक विकास, वक्फ व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे मंगळवारी (ता. 6) आपल्या शिष्टमंडळासह जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथील अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गेल्यावर्षी सत्तार कृषीमंत्री असताना फेब्रुवारी महिन्यातच जर्मनी दौऱ्यावर गेले होते. आता पणन मंत्री म्हणून ते 6 ते 16 फेब्रुवारी दरम्यानच्या या विदेश अभ्यास दौऱ्यावर गेले आहे. यावेळी ते जागतिक बाजारपेठेसह शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, उत्पान क्षमतांसह इतर विषयांचा अभ्यास करणार आहेत.

सत्तार यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ स्वित्झर्लंड आणि जर्मनी येथे अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले आहे. कृषी क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्याच्या प्रतिनिधी सोबत सत्तार (Abdul Sattar) व शिष्टमंडळ संवाद साधणार आहेत. तसेच जर्मनी येथील बर्लिन येथे फ्रुट लॉजीस्टिका 2024 आंतराष्ट्रीय प्रदर्शन त्यासोबतच झुरीच येथील सुपर मार्केट, रॉयल फ्लोराहॉलंड व ब्लोमेन मार्केट व स्टीन्स या आंतराष्ट्रीय फुलांच्या मार्केटलाही हे शिष्टमंडळ भेट देणार आहेत.

Abdul Sattar
Cabinet Ayodhya Tour : राज्य मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा लांबणीवर? काय आहेत कारणं ?

स्वित्झर्लंडमधील फळे आणि भाज्यांचे आयातदार आणि लिंबूवर्गीय प्रकिया तंत्रज्ञान पुरवठादार कंपन्यांच्या प्रतिनिधी सोबत आयोजित बैठकीत सत्तार यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित असणार आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये जर्मनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद व ऑरगॅनिक व्यापार मेळाव्याला अब्दुल सत्तार यांनी कृषीमंत्री म्हणून हजेरी लावली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या वर्षी ही परिषद 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान झाली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. भाजपसोबत सत्ता स्थापन झाल्यानंतरच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अब्दुल सत्तार यांना कॅबिनेटपदी बढती देऊन कृषीमंत्री केले होते. परंतु सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची एन्ट्री झाली, आणि सत्तारांचे कृषीमंत्री पद काढून ते धनंजय मुंडे यांना देण्यात आले.

कृषीमंत्री पद गेले असले तरी गेल्यावर्षी या खात्याचा मंत्री म्हणून केलेला जर्मनी दौरा, याहीवेळी सत्तार यांनी राज्याचे पणन खात्याचे मंत्री म्हणून केला. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याऐवजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची दुसऱ्यांदा या विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Abdul Sattar
Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदींच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'चे उद्धव ठाकरेही लाभार्थी; भाजपच्या ट्विटची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com