Abdul Sattar : अब्दुल सत्तारांचे 'जय श्रीराम'; बाजार समितीत सगळ्याच जागा जिंकल्या !

Sillod Soygaon Bazar Samiti : सिल्लोड-सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विरोधकांचा धुव्वा
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Politics : राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीत जय श्रीराम शेतकरी सहकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला. सत्तार यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकत विरोधी सिद्धेश्वर-मुर्डेश्वर परिवर्तन शेतकरी सहकार विकास पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला.

साडेपाच हजार मतदार असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी (ता. 28) 94 टक्के मतदान झाले. अब्दुल सत्तार यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घालून प्रचाराची धुरा सांभाळली. सत्तार यांच्या नेतृत्वाखालीच नुकत्याच झालेल्या जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत त्यांच्या गटाचे 15 पैकी 13 उमेदवार विजयी झाले होते. यात त्यांच्या मोठ्या भावाचाही समावेश होता.

Abdul Sattar
Uddhav Thackeray : राऊतांची उमेदवारी निश्चित, ठाकरेंच्या दौऱ्यात प्रचाराचा शुभारंभ?

या निवडणुकीनंतर सिल्लोड-सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या बाजार समितीवर अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) एकहाती सत्ता मिळवण्यासाठी जोर लावत तालुक्यात प्रचाराचा धडाका लावला होता. अखेर जय श्रीराम शेतकरी सहकारी विकास पॅनलचे सर्व 18 उमेदवार निवडून आणत सत्तारांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अब्दुल सत्तारांनी हिंदू देवदेवतांच्या मंदिरातून वाढवला होता. तसेच प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी मतदारसंघातील संत-महंताचे आशिर्वाद घेतले होते. सिल्लोड येथील श्री म्हसोबा महाराज संस्थान, श्रीराम मंदिर सिल्लोड, धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर तसेच श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थान केळगाव येथे प्रचार नारळ फोडून प्रचाराला सुरवात केली होती.

Abdul Sattar
OBC Reservation : ओबीसींचे शून्य टक्केही आरक्षण कमी होणार नाही !

जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना कपबशी या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन सत्तारांनी केले होते. त्यांच्या पॅनलमधील 'जय श्रीराम'ला प्रतिसाद देत मतदारांनी सगळे उमेदवार निवडून दिले. गेल्या बाजार समितीत अब्दुल सत्तार यांचीच एकहाती सत्ता होती, ती पुन्हा राखण्यात त्यांना यश आले आहे.

राज्यात महायुती असल्यामुळे या पॅनलसमोर फार मोठे आव्हान नव्हतेच. परंतु निवडणूक व्हावी यासाठी सत्तार यांच्या पॅनल विरोधात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकत्रित येत सिद्धेश्वर-मुर्डेश्वर परिवर्तन शेतकरी सहकार विकास पॅनल निवडणुकीत उतरवले होते. तालुक्यात या पॅनलच्या प्रमुखांनी प्रचारही केला, पण सत्तारांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्याचा सत्तार यांचा प्रयत्न पुन्हा यशस्वी ठरला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Abdul Sattar
Chhagan Bhujbal News : ...तर आगामी काळात भुजबळ अन् भाजप एकत्र येऊ शकतात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com