Uddhav Thackeray-Bhausaheb Patil Chikatgaonkar
Uddhav Thackeray-Bhausaheb Patil ChikatgaonkarSarkarnama

Shivsena UBT News : ठाकरेंनी शब्द फिरवला, माजी आमदाराचा पक्षाला जय महाराष्ट्र..

Uddhav Thackeray backtracked, former MLA Chikatgaonkar left the party : दोन वर्षापूर्वी वैजापूर मधील काँग्रेसच्या ठोंबरे पिता-पुत्रांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे नाराज झालेल्या चिकटगावकरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार? याची चर्चा सुरू आहे.
Published on

Shivsena UBT Political News : दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आज पक्षाला जय महाराष्ट्र केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चिकटगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला होता. पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच निवडून आलेले प्रा.रमेश बोरणारे यांना केलेल्या गद्दारीचा धडा शिकवण्यासाठी दानवे यांनी चिकटगावकरांना शिवसेनेत प्रवेश देत मोठी खेळी केली होती.

मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैजापुरातील भाजपच्या एका नेत्याला पक्षात घेऊन त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली पक्ष पातळीवर सुरू आहेत. (Shivsena) या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी वेगळा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली होती. या नाराजीतूनच चिकटगावकर यांनी युवा सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वैजापूर येथील दौऱ्यावर बहिष्कार टाकला होता.

दोन वर्षापासून विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या चिकटगावकर यांना डावलून ऐनवेळी भाजपमधून आयात केल्या जाणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यापासून वैजापूर मध्ये सुरू होती. येत्या 17 तारखेला उद्धव ठाकरे वैजापुरात येणार असून त्यांच्या उपस्थितीत भाजपचे नेते दिनेश परदेशी हे शिवसेनेची मशाल हाती घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

Uddhav Thackeray-Bhausaheb Patil Chikatgaonkar
Shivsena UBT News : दानवेंना खैरे नको, तर खैरेंना शिंदे ; पश्चिम मतदारसंघात चाललंय काय ?

या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आज मतदार संघातील आपल्या समर्थकांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का दिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून चिकटगावकर यांचे पुतणे अभय पाटील यांनी उमेदवारीवर दावा केला होता. तेव्हा अजित पवार यांनी तरुण चेहऱ्याला संधी देत विद्यमान आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या ऐवजी अभय पाटील यांना उमेदवारी दिली होती.

तर उमेदवारीवरून आमच्या कुटुंबात वाद नको, अशी भूमिका घेत भाऊसाहेब पाटील यांनी माघार घेतली होती. पण अभय पाटील चिकटगावकर यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीने हातची जागा गमावली होती. शिवसेनेचे रमेश बोरनारे हे त्यावळी विजयी झाले होते. त्यानंतर दोन वर्षापूर्वी वैजापूर मधील काँग्रेसच्या ठोंबरे पिता-पुत्रांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे नाराज झालेल्या चिकटगावकरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाऊसाहेब पाटील चिकटगावकर कोणत्या पक्षात जाणार? याची चर्चा सुरू आहे.

Uddhav Thackeray-Bhausaheb Patil Chikatgaonkar
Uddhav Thackeray : उद्धवसाहेब… सोडून गेलेल्यांना पवारसाहेबांनी धडकी भरवली, आपण कधी सक्रिय होणार?

महाविकास आघाडीतील शिवसेना घटक पक्षाला सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आघाडीमध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने चिकटगावकर यांना उमेदवारी मिळणे तसे कठीणच आहे. अशावेळी महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचा पर्याय चिकटगावकर यांच्याकडे असला तरी विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांना डावलून त्यांना उमेदवारी मिळणे शक्य नाही. अशावेळी चिकटगावकर काय भूमिका घेतात ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com