Pankaja Munde Letter To CM: हज यात्रेकरूंसाठी मुंबई विमानतळाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, मुख्यमंत्र्यांना पत्र..

BJP News : छत्रपती संभाजीनगर विमानतळ या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी यात्रेकरूंना अतिरिक्त ८८,००० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
Pankaja Munde Letter To CM
Pankaja Munde Letter To CMSarkarnama

Beed News : सध्या हज यात्रेकरुंना छत्रपती संभाजीनगर येथून विमानाने जाण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त रक्कमेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. (Beed News) सर्वच राजकीय पक्षाच्या खासदार, नेत्यांनी या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाशी पत्र व्यवहार सुरू केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची देखील नुकतीच बीडमध्ये मुस्लिमांच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेवून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

Pankaja Munde Letter To CM
Nana Patole News: ''महाडची जागा आमचीच आणि...!'' ; पटोलेंच्या दाव्यामुळे ठाकरे गटासह जगतापांची डोकेदुखी वाढली

त्यानूसार पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह हज कमिटी, केंद्रीय उड्डयण मंत्री, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाला पत्र पाठवून या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तसेच मराठवाडा आणि महाराष्ट्रातून हजसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंना मुंबई विमानतळाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी (Pankaja Munde) मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, हज यात्रा ही मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र व महत्वाची यात्रा असून महाराष्ट्रातून हजारो भाविक जात असतात. (Marathwada) या यात्रेसाठी जाण्याकरता भाविकांना मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे पर्याय देण्यात आले आहेत. परंतु, संभाजीनगर विमानतळ या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी यात्रेकरूंना अतिरिक्त ८८,००० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

प्रधानमंत्री कार्यालय, हज कमिटी ऑफ इंडिया, नागरी उड्डाण मंत्रालय, केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्रालय यांना पत्राद्वारे विनंती आहे, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात पुढाकार घेऊन मार्ग काढावा व सर्वसामान्य गरीब यात्रेकरूंचा विचार करून आपण त्यांना मुंबई विमानतळ हा पर्याय उपलब्ध करून द्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com