Aurangabad News: ज्यांच्या मनात सत्ता, सत्तेची खुर्ची होती त्यांनी गद्दारी करून राज्यात घटनाबाह्य सरकार स्थापन केले. पण त्यांच्या नशिबी आता रिकाम्या खुर्च्या पाहण्याची वेळ आल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांच्या वरळीतील फ्लाॅप सभेवरून लगावला. औरंगाबाद पुर्वचे आमदार तथा राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघात झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू आह. (Shivsena) कोविडची दोन वर्ष संपून गेली तरी हे सरकार महापालिका, जिल्हापरिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला तयार नाही, कारण त्यांच्यात हिमंतच नाही, अशी टीका देखील ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सध्या सुरू आहे.
या अंतर्गत काल त्यांचा जालना व औरंगाबादमध्ये मेळावा पार पडला. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याच्या आरोपानंतर बदनापूर आणि शहरातील गजानननगर भागात त्यांचा मेळावा झाला. पोलिसांनी यावेळी तगडा बंदोबस्त ठेवला होता. आमदार निधीतून होत असलेल्या साडेपाच कोटींच्या कामाचे भुमीपूजन व उद्धाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ठाकरे म्हणाले, सध्याचे सरकार हे घटनाबाह्य सरकार असून मंत्रालयात बसून फक्त खोके जमवण्याचे त्यांचे काम सुरू आहे. निवडणुकांना सामोरे जाण्याची हिमंत सरकारमध्ये नाही. आमचे आमदार त्यांच्या निधीतून विकासकामे करत आहेत, हे मात्र खोके जमवण्यात दंग आहेत. आपण जिथे जिथे जातोय तिथे सभेला गर्दी होत आहे.
पण ज्यांच्या मनात आधीपासून सत्तेची खुर्ची होती, त्यांना सत्ता तर मिळाली, पण जनतेच्या मनात जागा मिळाली नाही, त्यांच्या नशिबी रिकाम्या खुर्च्याच आल्या, असा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील फ्लाॅप सभेवरून लगावला. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देवून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे खुले आव्हान दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वरळीतील सभेला फारशी गर्दी झाली नव्हती. या सभेत रिकाम्या खुर्च्या होत्या, यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदेवर निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.