Aditya Thackeray Tour : आदित्य ठाकरे घाटीसह नांदेड-नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला भेट देणार...

Marathwada Political News : रुग्णसंख्या, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, औषधी या संदर्भात ते अधिष्ठातांकडून माहिती घेतील.
Aditya Thackeray  News
Aditya Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयात नवजात बालकांसह एकाच दिवशी अनेक रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली. (Aditya Thackeray Visit News) राज्यातील आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणेचे पितळ या घटनांमुळे उघडे पडले. एकाच दिवसात अनेक रुग्णांचे प्राण गेल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकार आणि त्यांच्या यंत्रणेबद्दल संताप आहे.

Aditya Thackeray  News
Prashant Bamb-Satish Chavan Politics : बंब यांच्या अष्टविनायक यात्रेला राष्ट्रवादीच्या चव्हाणांचे निधीतून प्रत्युत्तर...

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे युवा नेते (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे उद्या, दि. ९ रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. (Shivsena) शासकीय रुग्णालय अर्थात घाटीला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा, औषधांचा पुरवठा, उपलब्ध साधन सामग्री याची पाहणी करून ते अधिष्ठातांशी चर्चा करणार आहेत.

संभाजीनगर येथे पाहणी केल्यानंतर ते नांदेड आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयांनादेखील भेट देणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कळवले आहे.(Marathwada) ३ ऑक्टोबर रोजी घाटी येथे आरोग्य सुविधाअभावी १४ रुग्ण एकाच दिवशी दगावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.

तत्पूर्वी ठाणे, नांदेडच्या शासकीय रुग्णालयांत एकाच दिवशी रुग्ण दगावल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची ही पाहणी भेट असणार आहे. सकाळी ११ वाजता ते घाटी रुग्णालयात जाणार आहेत. येथील रुग्णसंख्या, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, औषध या संदर्भात ते अधिष्ठातांकडून माहिती घेतील. घाटीतील पाहणी संपल्यानंतर ते पुढे नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.

तिथून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी ते जाणार असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालयात ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाले होते. यात नवजात अर्भकांचाही समावेश होता. या प्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

Aditya Thackeray  News
Parbhani VBA politics : `वंचित`चा करिश्मा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही दिसेल का ?

नांदेड येथील बालकांच्या मृत्यूची दखल राज्य बालहक्क आयोगाने घेतली आहे. या शिवाय ६२ रुग्णांच्या मृत्यूला कोण जबाबदार, असा संतप्त सवाल मृत व्यक्तींच्या नातेवाइकांनी प्रशासनाला केला होता. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नांदेडसह छत्रपती संभाजीनगर, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला भेटी दिल्या होत्या. आता आदित्य ठाकरे हेही रुग्णालयांना भेट देण्यासाठी उद्यापासून मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com