Aaditya Thackeray In Marathwada: मंत्रीमंडळ मराठवाड्यात येण्याआधीच आदित्य ठाकरेंचा दौरा..

Affected Farmers News : एक महिना पावसाने पाठ फिरवली होती. या काळामध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
Aditya Thackeray News :
Aditya Thackeray News : Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : सात वर्षांनंतर राज्य मंत्रीमंडळाची १६ सप्टेंबर रोजी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात बैठक होत आहे. मंत्रीमंडळ मराठवाड्यात येण्याआधीच माजी मंत्री आदित्य ठाकरे उद्या दि.१५ रोजी जिल्ह्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांचा हा दौरा शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी असणार आहे.

Aditya Thackeray News :
Dr. Bhagwat Karad Promised: आदर्श पतसंस्थेची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार..

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना २०१६ मध्ये संभाजीनगरमध्ये मंत्रीमंडळाची बैठक झाली होती. (Shivsena) त्यावेळी मराठवाड्यासाठी केलेल्या तब्बल ४९ हजार कोटींच्या घोषणा अद्याप पुर्ण झालेल्या नाहीत, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ बैठकीच्या एकदिवस आधीच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संभाजीनगर,पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी ते बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेणार आहेत. (Affected Farmers) संभाजीनगर तालुक्यातील निपाणी येथे सकाळी ११.३० वाजता, पैठण तालुक्यातील लोहगांव येथे दुपारी १२.४५ वाजता, गंगापुर तालुक्यातील गुरुधानोरा येथे दुपारी १.३० वाजता व वैजापूर मतदार संघातील मुद्देशवाडगांव येथील शेतकऱ्यांसमवेत दुपारी अडीच वाजता ते संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस झालेला असला तरीही मध्यंतरी एक महिना पावसाने पाठ फिरवली होती. या काळामध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. परंतु शासनाने या नुकसानीची अग्रीम भरपाई देण्याचे आश्वासन दिलेले असले तरीही मदत पोहचलेली नाही. हीच सद्य परिस्थिती समजून घेण्यासाठी ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com