Sakal Maratha Samaj : बीडनंतर आता परभणीत सकल मराठा समाजाचे आंदोलन; संतोष देशमुखांसाठी ४ जानेवारीला काढणार मोर्चा

Parbhani Maratha Rally : परभणीत देखील सकल मराठा समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. रविवारी परभणीत सकल मराठा समाजाची बैठक झाली.
Santosh Deshmukh
Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेला २१ दिवस पूर्ण झाले तरी या हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत.

दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये शनिवारी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर आता परभणीत देखील सकल मराठा समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. रविवारी परभणीत सकल मराठा समाजाची बैठक झाली.

यामध्ये सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 4 जानेवारीला हा मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

परभणीत यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते. 4 जानेवारी रोजी परभणीत मुक मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे.

नूतन मैदान येथून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात केली जाणार आहे. हा सर्वपक्षीय मोर्चा असणार आहे. या मोर्चाला संतोष देशमुख यांची मुलगी आणि भाऊ उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट; वाल्मिक कराडसह चार आरोपींवर केली 'ही' कारवाई

सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आता परभणीतही मोर्चा काढण्यात येणार आहे. 4 जानेवारीला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.

आरोपींना अटक होत नसल्याने बीडमधील सर्व पक्षीय मोर्चात आरोपींना तात्काळ अटक करत फाशी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलक आणि मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी केली होती. या मोर्चात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, भाजप (Bjp) आमदार अभिमन्यू पवार, भाजप आमदार सुरेश धस, शरद पवारांचे आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. याशिवाय आता परभणीत देखील मोर्चा काढण्यात येणार आहे.

Santosh Deshmukh
Parbhani Somnath Suryavanshi death case : परभणी दौऱ्यापूर्वीच राहुल गांधींवर भाजपचा 'निशाणा'; बावनकुळे म्हणताय, 'राजकारणासाठी नौटंकी...'

दरम्यान, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार सीआयडीकडून या प्रकरणी कारवाई केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com