Parbhani Somnath Suryavanshi death case : परभणी दौऱ्यापूर्वीच राहुल गांधींवर भाजपचा 'निशाणा'; बावनकुळे म्हणताय, 'राजकारणासाठी नौटंकी...'

BJP state president Chandrashekhar Bawankule Congress Lok Sabha opposition leader Rahul Gandhi Parbhani : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उद्याच्या सोमवारी परभणी दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या सोमवारी परभणी दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांच्या या दौऱ्यापूर्वीच भाजप सावध झाली असून, त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.

"राहुल गांधी यांचा हा दौरा म्हणजे, नौटंकी आहे. हे करण्यापेक्षा समाजाला न्याय देण्यासाठी विधायक काम करावे", असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "राहुल गांधी यांचा परभणीचा दौरा म्हणजे, नौटंकी आहे. त्यांनी समाजाला न्याय देण्यासाठी विधायक काम करावे. महाराष्ट्रातील समाज त्यांना साथ देणार नाही. महाराष्ट्रातील सर्व समाज एकत्र आहे. दूषित वातावरणावर आमचे सरकार लक्ष ठेवून आहे". 'ईव्हीएम'वर देखील नौटंकी करत आहेत. यांच्या या नौटंकीला महाराष्ट्र बळी पडणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले.

Chandrashekhar Bawankule
Local Bodies Election : भाजप महाअधिवेशनातून 'स्थानिक'च्या निवडणुकीचा शंखनाद करणार

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या घटनेतील आरोपी हा मनोरुग्ण आहे. त्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. या घटनेवर आता काँग्रेसचे (Congress) राहुल गांधी यांना राजकारण करायचे आहे. संविधानाच्या मुद्यावर देखील लोकसभेत राजकारण केले. परभणीची घटना दुर्दैवी आहे. हा दौरा करून त्यांना राजकारण करायचे आहे. संविधानावर आणि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खरा राग, तर काँग्रेसचा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या घटकापर्यंत अधिकार दिले. याच बाबासाहेबांना काँग्रेसने संपवण्याचे काम काँग्रेसने केले', असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

Chandrashekhar Bawankule
Bhavishyanama : २१ ते २७ डिसेंबर ; रुसवे-फुगवे अन् पक्षांतराच्या घटना

दरम्यान, परभणीतील हिसांचारात पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेवर राजकारण तापले आहे. आंबेडकर चळवळीचे लोक नाराज आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांची काल भेट घेतली. वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील या घटनेवर आक्रमक आहेत.

यातच उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा परभणी दौरा होत आहे. राहुल गांधी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार का? घेतल्यास काय भूमिका घेतात, याची चर्चा सध्या आहे. राहुल गांधी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याने काँग्रेससह विरोधक, सत्ताधारी यांचे लक्ष राहणार आहे. यावर भाजपने राहुल गांधी यांच्यावर दौऱ्यापूर्वी टीका करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com