MNS On Aurangzeb News : सकाळी मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र अन् रात्री 'औरंगजेबला मराठ्यांनी इथे गाडला'ची पोस्टर झळकली!

Maharashtra Navnirman Sena (MNS) has launched a banner campaign in Chhatrapati Sambhajinagar following Raj Thackeray's directive. : राज आदेश निघाल्यानंतर औरंगजेबची कबर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात तातडीने हालचाली सुरू झाल्या.
MNS Show Poster On Aurangzeb News
MNS Show Poster On Aurangzeb NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : 30 मार्च म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केले. कबर उखडून टाका, अशी मागणी करणाऱ्या राजकीय नेत्यांना खडसावत 'मराठ्यांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबला इथे गाडला' हा इतिहास नव्या पिढीला सागण्यासाठी ही कबर राहू द्या. तेथील सजावट काढून बोर्ड लावा, शालेय सहली काढा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.

राज आदेश निघाल्यानंतर औरंगजेबची कबर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात तातडीने हालचाली सुरू झाल्या. (MNS) मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी काल सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले होते. औरंगजेबच्या कबरीजवळील सजावट काढून टाका, यावर सरकारी एक रुपयाही खर्च होता कामा नये, मराठ्यांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबला इथे गाडला असे फलक लावा, सीसीटीव्हा लावून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजित करण्याचे आदेश द्या, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.

सकाळी हे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख चौक आणि औरंगजेबची कबर असलेल्या खुलताबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. मनसेच्या या बॅनरवर राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे फोटो असून संभाजीनगर ते खुलताबाद येथील (Aurangzeb) औरंगजेब कबरीचे अंतर किलोमीटरमध्ये दर्शवण्यात आले आहे. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, असे या बॅनरवर ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.

MNS Show Poster On Aurangzeb News
Amol Kolhe News : 'मराठ्याच्या शौर्याचं प्रतिक ती कबर आहे', कोल्हे नेमकं काय म्हणाले?

या बॅनरची राज्यभरात चर्चा सुरू असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. विशेष म्हणजे औरंगजेबची कबर काढून टाकण्याची मागणी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिक घेत आंदोलने केली. नागपूरात याच मुद्यावरून दंगल भडकली होती. दरम्यानच्या काळात औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली होती. लोकांमध्ये भितीचे वातावरण असल्याची चर्चा होती.

MNS Show Poster On Aurangzeb News
Imtiaz Jaleel On Raj Thackeray News : औरंगजेबची कबर काढू नये, राज ठाकरेंच्या भूमिकेशी इम्तियाज जलील सहमत!

राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर तसेच रमझान ईदच्या सुट्यामुळे मात्र अचानक पर्यटकांची संख्या वाढली. औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यासाठी खुलताबादेत रागां लागल्याचे चित्र होते. जिथे पन्नास ते साठ पर्यटक यायचे तिथे अचानक तीन ते चार हजारांची गर्दी गेल्या दोन-तीन दिवसात दिसून आली. एकूणच औरंगजेबच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आणि राजकारण याचे कसे पडसाद येत्या काही दिवसात उमटते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com