Mla Babasaheb Patil - Manoj Jarange
Mla Babasaheb Patil - Manoj JarangeSarkarnama

Manoj Jarange News : अजितदादांचे आमदार पोचले जरांगेंच्या भेटीला, म्हणाले आम्ही..!

Marathwada Lok Sabha Election : जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही जरांगे फॅक्टरचा फटका बसला असून त्यांना निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला आहे.

Jalna News : लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात मराठवाड्यात महायुतीच्या उमेदवारांना जोरदार फटका बसला. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुतीच्या आठ पैकी सात उमेदवारांचा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यासाठी मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. बीड तसेच जालना या मतदारसंघात सध्या हा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे.

बीड लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी विजयानंतर थेट मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेत आभार मानले. या निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका महत्वपूर्ण ठरल्याने भविष्यात याचा त्रास आपल्याला होऊ नये, यासाठी राजकीय नेत्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याचे ठरविले आहे. त्यातच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली.

आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असा शब्द त्यांनी दिला. आमदार पाटील यांनी जरांगे यांच्या भेटीची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या पराभवाला मराठा (Maratha) आरक्षण आणि मनोज जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात असल्याची कबुली महायुतीचे नेते जाहीरपणे देत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही जरांगे फॅक्टरचा फटका बसला असून त्यांना निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला आहे.याचा फटका पुढील काळात आपल्याला बसू नये, याासाठी काळजी घेण्यास राजकीय नेत्यांनी सुरूवात केली आहे.

Mla Babasaheb Patil - Manoj Jarange
Manoj Jarange : उपोषणाला परवानगी नाकारताच जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, शिंदे-फडणवीसांना म्हणाले, "विनाकारण…"

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी अंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली. 50 गाड्यांचा ताफा घेत शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार पाटील येथे पोहचले. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा शब्द आमदार पाटील यांनी जरांगे यांना दिला. आमदार पाटील यांना जरांगे यांची घेतलेल्या भेटीचा उद्देश नेमका काय, निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय पक्षांची नेतेमंडळी मनोज जरांगेंच्या भेटीसाठी का येत आहेत, याची जोरदार चर्चा आता मराठवाड्यात सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com