Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis And Ekanth Shinde: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्याच्या राजकारणात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
जरांगे फॅक्टरमुळे राज्यात महायुतीला फटका बसल्याचं बोललं जात आहे. अशातच अंतरवाली सराटी येथील जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या याच भूमिकेवर जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
8 जून पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषण करणार होते. मात्र, काही गावकऱ्यांनी त्यांच्या उपोषणाला विरोध करत निवदेन दिल्याने त्यांच्या उपोषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मी आमरण उपोषणावर ठाम असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
जरांगे म्हणाले, "चार तारखेला आचारसंहिता होती, मी आचारसंहितेचा सन्मान केला. मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. मी कायद्याला मानतो, कायद्याने मला अधिकार दिला आहे. हे आंदोलन स्थगित आहे, स्थगित केलेल्या आंदोलनाला परवानगीची गरज नाही." असं म्हणत जरांगेंनी ते त्यांच्या भुमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला. 'तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका', असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जरांगे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस हे तुम्ही चांगलं काम करत नाही. शिंदेसाहेब तुम्ही सुद्धा. तुम्ही मराठ्यांच्या नजरेतून उतरू नका, तुम्हा दोघांनाही सांगतोय मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. आंदोलन मोडायच्या मागे लागू नका, ह्या आंदोलनाला पहिल्यापासून परवानगी आहे. स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू आहे, तुम्ही विनाकारण डाव रचू नका."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.