Terna Sugar Factory News : एका तपाच्या प्रतीक्षेनंतर अखेर `तेरणा`चे बाॅयलर पेटले

Marathwada Political News : तेरणा कारखाना सुरू झाला, तर ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे.
Terna Sugar Factory News
Terna Sugar Factory NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : "पंढरीतील पांडुरंगाने आम्हास हाक दिली, की माझा एकनिष्ठ भक्त संत गोरोबाकाका यांच्या पावन भूमीत "तेरणा" कारखाना खितपत पडलेला आहे. (Terna Sugar Factory) त्यास तुम्ही मदतीस धावून जावे म्हणून आम्ही तेरणाच्या मदतीस आलो आहोत", अशा शब्दांत भैरवनाथचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत यांनी शनिवार, दि. २१ रोजी भैरवनाथ संचलित तेरणा साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी भैरवनाथ ग्रुपचे उपाध्यक्ष अनिल सावंत हेही उपस्थितीत होते.

Terna Sugar Factory News
Abdul Sattar News : गर्दी जमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सत्तारांवर टाकली मोठी जबाबदारी...

गेल्या बारा वर्षांपासून म्हणजेच एक तप तेरणा कारखाना बंद अवस्थेत होता. त्यामुळे या भागातील ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. हा कारखाना सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही. (Factory) अखेर बारा वर्षांनी तेरणाचे बाॅयलर पेटलेच. तेरणा कारखाना सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

"मागील संचालक मंडळांनी या ठिकाणी अनेक सुख सुविधा निर्माण करून ठेवल्या त्यात शिक्षण, कामगारांना राहण्यास घरे याचा समावेश आहे. (Marathwada) मात्र, आलेल्या संचालक मंडळांनी कारखान्याचे रक्षण करण्याऐवजी ओरबडण्याचे काम केले. यामुळे कारखान्यावर प्रचंड मोठा कर्जाचा बोजा निर्माण झाला. (Dharashiv) अशा प्रसंगी आम्हीही त्यावेळी त्यांना बारा कोटींची मदत केली ती मदत अद्यापही आम्हाला परत मिळालेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मदत मागितली म्हणून दिली हा आमचा गुन्हा ठरला की काय? असे म्हणत सावंत यांनी तेरणा बंद पडण्यास कारणीभूत ठरेल्या विरोधकांवर टीका केली. तब्बल बारा वर्षांनंतर तेरणा चालू होत असल्याने या ठिकाणी सर्वत्र सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचेही सावंत म्हणाले. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३२५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी तेरणा साखर कारखाना हा २५ वर्षे भाडेतत्त्वावर देण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी प्रक्रिया राबवण्यात आली होती.

यासाठी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्याेग समूहाने अनामत रक्कम जमा करून बोली लावली होती. ६ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेरणा कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भैरवनाथ साखर उद्याेग यांचे ट्राय पार्टी अॅग्रिमेंट झाले होते. तेरणा सहकारी साखर कारखान्याचे ३५ हजार सभासद असून, किमान १२० गावांत सभासद आहेत. या कारखान्यात १५०० हजार कर्मचारी असून, त्यांना आता रोजगार उपलब्ध होणार आहे. तेरणा कारखाना सुरू झाला तर ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांचे तेरणा साखर कारखान्यावर वर्चस्व होते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com