Marathwada Political News : मतदारसंघावर मजबूत पकड, मी म्हणेल तीच पूर्वदिशा अशा राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत. (Shivsena Rally News) शिंदेंच्या उठावात सहभागी झाल्यानंतर सत्तारांना त्याचे मोठे बक्षीस नव्या सरकारमध्ये मिळाले होते. कृषीसारख्या महत्त्वाच्या खात्याचे काही काळ का होईना सत्तारांनी मंत्रिपद भूषवले.
गर्दी जमवण्यात हातखंडा असलेल्या अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) गेल्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्याला सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने लोक गेले होते. अब्दुल सत्तार यांनी सगळी सोय केल्यामुळे कुठल्याही मंत्र्याच्या मतदारसंघातून आली नाही, इतकी गर्दी एकट्या सत्तारांनी जमवली होती. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा सत्तारांच्या मतदारसंघात आले होते, तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने स्वागत केले होते, ते पाहून मुख्यमंत्री चांगेलच भारावले होते.
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला सडेतोड उत्तर द्यायचे म्हणजे आझाद मैदानावर उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा जास्त गर्दी व्हायला हवी, असा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहे. (Marathwada) यात यंदाही अब्दुल सत्तार यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज सिल्लोडमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला मतदारसंघातील लोकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. शिवसेना पक्ष निरीक्षक माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी अभियानातून राज्यातील गरजू व सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला. एक रुपयात पीकविमा, एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट शेतकऱ्यांना नुकसानभरपाई यांसारखे अनेक जनकल्याणकारी निर्णय घेऊन राज्याला विकासाच्या शिखरावर नेण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्याचा विकास साधत असताना त्यांनी सिल्लोड - सोयगावच्या विकासासाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी या बैठकीत केले. अब्दुल सत्तार यांचे काम सर्वसमावेशक आहे. एक धडाडीचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मतदारसंघात केलेला विकास आणि दांडगा जनसंपर्क त्यांची कामाची गुरुकिल्ली आहे. पक्षाच्या आढावा बैठकीला उपस्थित जनसमुदाय पाहता ही आढावा बैठक नसून आशीर्वाद बैठक असल्याचे कौतुक बजोडीया यांनी या वेळी केले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.