Dattatray Bharne: कृषीमंत्री भरणेंनी थेट अधिकाऱ्यांना लावला फोन; एक गुंठा जमीन जरी पंचनाम्याशिवाय राहिली तर..

Dattatraya Bharane Orders Maharashtra crop loss Panchnama: "कृषी विभागातील अधिकारी, महसूल अधिकारी यांना सोबत घेऊन एकही पंचनामा शिल्लक ठेवू नका, सर्व पंचनामे नीट करा," असे आदेश भरणेंनी दिला.
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

राज्यात अतिवृष्टीमुळे काही दिवसापासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषता मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी आज राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सोमटाणा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांची संवाद साधला.

शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर भरणेंनी थेट कृषी अधिकाऱ्यांना फोन लावला. "कृषी विभागातील अधिकारी, महसूल अधिकारी यांना सोबत घेऊन एकही पंचनामा शिल्लक ठेवू नका, सर्व पंचनामे नीट करा," असे आदेश भरणेंनी दिला. 'एक गुंठा जमीन जरी पंचनाम्याशिवाय राहिली तरी त्याला तुम्ही अधिकारी जबाबदार राहणार,' अशा शब्दात भरणेंनी अधिकाऱ्यांना सांगितले.

संभाजीनगरातील बदनापूर तालुक्यात असलेल्या सोमठाणा गावात कृषिमंत्री येताच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. त्यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या. हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहून कृषिमंत्रींही अधिकाऱ्यांवर संतापले.

"एक गुंठ्याचा पण पंचनामा सुद्धा शिल्लक राहणार नाही. सगळ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले. "ज्यांचे पशुधन वाहून गेले आहेत. त्यांना देखील नुकसान भरपाई मिळेल, असे भरणे यांनी सांगितले.

Dattatray Bharne
Prakash Devale: कट्टर शिवसैनिक, नेता-अभिनेता-दिग्दर्शक! प्रकाश देवळे यांची 'अनटोल्ड स्टोरी-मिशन इंडिया'

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमधील अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. हजारो हेक्टरी शेती वाहून गेली आहे. सरकारचे मंत्री बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी सात वाजताच सोलापुरात पोहचले, ते धाराशीव येथे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही धाराशीवच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे या जालना जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर आणि लातुरच्या दौऱ्यावर आहेत.

  1. राज्यात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे.

  2. सुमारे ७० लाख एकराचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.

  3. जालन्यात २ लाख ५४ हजार एकराचे नुकसान झाले आहे.

  4. जालना, अहिल्यानगर या ठिकाणी मोठा पाऊस झाला आहे.

  5. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

  6. सध्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे युद्धपातळीवर सुरु आहेत.

  7. महसूल विभाग, कृषी विभागाकडून हे काम सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com