Ahmadpur NagarPalika : मतदारांचा चक्रावणारा कौल! नगराध्यक्ष भाजपचा तर बहुमत राष्ट्रवादीकडे; तब्बल 21 नवे नगरसेवक

Ahmedpur Nagar Parishad Result : अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत नवख्यांना संधी देण्याचा पॅटर्न कायम राहिला. भाजपच्या स्वप्निल व्हते यांचा विजय, तर बहुमत असूनही राष्ट्रवादीला अध्यक्षपद गमवावे लागले.
Newly elected Ahmedpur Municipal Council President Adv. Swapnil Vhate celebrates victory as BJP gains momentum, while NCP reflects after losing the president post despite winning more seats.
Newly elected Ahmedpur Municipal Council President Adv. Swapnil Vhate celebrates victory as BJP gains momentum, while NCP reflects after losing the president post despite winning more seats.Sarkarnama
Published on
Updated on

विश्वंभर स्वामी

Latur District Politics : अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत नवख्यांना संधी देण्याची जुनी परंपरा यंदाही कायम राहिली आहे. ऐनवेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळून निवडून आलेल्या नूतन नगराध्यक्ष ॲड. स्वप्निल व्हते यांच्या विजयामुळे भारतीय जनता पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे नगरपरिषदेत 16 जागा जिंकूनही अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मचिंतन सुरू झाले आहे.

अहमदपूरकरांनी नेहमीच नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा कौल दिला आहे. 2014 मध्ये सुधाकर नागरगोजे थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. 2019 मध्ये नवख्या अपक्ष उमेदवार अश्विनी कासनाळे यांनी बाजी मारली होती. तर 2025 मध्येही हीच परंपरा पुढे नेत जनतेने ॲड. स्वप्निल व्हते यांना संधी दिली आहे. मात्र, पक्षीय बलाबल व समन्वयाच्या राजकारणात ते कितपत यशस्वी ठरतात, हे येणारा काळ ठरवणार आहे.

2014 मध्ये भाजपचे नगराध्यक्ष असतानाही बहुमत अपक्ष व काँग्रेसकडे असल्याने विकासकामांना अडथळे आले. 2019 मध्ये अपक्ष नगराध्यक्ष असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाल्याने अंतर्गत मतभेदांमुळे अपेक्षित विकास साधता आला नाही. त्यामुळे यंदा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची समन्वयाची भूमिका अहमदपूरच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

सध्या नगरपरिषदेत भाजपकडे केवळ 3 जागा असून, राष्ट्रवादीकडे बहुमत आहे. त्यामुळे प्रत्येक ठरावासाठी परस्पर सहकार्य आवश्यक आहे. नूतन नगराध्यक्ष ॲड. स्वप्निल व्हते यांनी जाहीरनाम्यानुसार विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अहमदपूरसाठी निधी मिळविण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

Newly elected Ahmedpur Municipal Council President Adv. Swapnil Vhate celebrates victory as BJP gains momentum, while NCP reflects after losing the president post despite winning more seats.
Nilanga News : भाजप उमेदवाराचा अवघ्या वीस मतांनी पराभव, पण मतदारांचे आभार मानण्यासाठी वाजत-गाजत काढली रॅली!

या निवडणुकीत 25 नगरसेवकांपैकी केवळ 4 जुने असून तब्बल 21 नगरसेवक प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या नवख्या प्रतिनिधींच्या हाती आल्या आहेत. संविधानाने दिलेल्या ताकदीवर, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनतेने मला संधी दिली, असे ॲड. व्हते यांनी सांगिते.

'नोटा'ला 585 मते

काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कलीमुद्दीन अहमद यांना 7660 मते मिळूनही एकही नगरसेवक निवडून आणता न आल्याने पक्षाची निराशा झाली आहे. या निवडणुकीत 18 ते 35 वयोगटातील तब्बल 17 हजार युवकांनी मतदान केल्याने निकालावर युवकांचा प्रभाव स्पष्ट दिसून आला. तर 'नोटा'ला एकूण 585 मते पडली असून प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वाधिक 130 नोटाला मतदान झाले.

Newly elected Ahmedpur Municipal Council President Adv. Swapnil Vhate celebrates victory as BJP gains momentum, while NCP reflects after losing the president post despite winning more seats.
Congress In Nagar Parishad : पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे दिग्गज फेल : फक्त पतंगराव कदमांच्या लेकाने राखली पक्षाची लाज

मतदारांनी दिली समान संधी

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना नगराध्यक्षपद मिळवता आले नसले तरी तब्बल 16 नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांचा प्रभाव शहरात कायम आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 व शिवसेनेचे 2 असे 5 उमेदवार निवडून आणले आहेत. तर भाजपच्या नेतृत्वानेही 3 नगरसेवक सोबतच अध्यक्षपदाचाही मान मिळवला. त्यामुळे शहरातील मतदारांनी सर्वच नेत्यांना समान संधी दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com