Imtiaz Jaleel attack case : इम्तियाज जलील यांच्यावरील महापालिका निवडणुकीतील जीवघेणा हल्ला प्रकरण; संशयित हल्लेखोराबाबत नवीन अपडेट!

Attack accused in Imtiaz Jaleel rally case granted anticipatory bail by district court ahead of civic polls : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या महापालिका निवडणूक प्रचार रॅली 7 जानेवारी 2026 हल्ला झाला होता.
 Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel Sarkarnama
Published on
Updated on

AIMIM leader attack case : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या महापालिका निवडणूक प्रचार रॅली दरम्यान 7 जानेवारी 2026 रोजी झालेल्या वादा प्रकरणी, संशयित आरोपी साहिल कलीम कुरेशी याला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश शौकत एस. गोरवाडे यांनी आज हा निर्णय दिला असून, यापूर्वी उच्च न्यायालयाने (Court) फेटाळलेल्या जामीन अर्जानंतर बदललेल्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

बायजीपुरा ते नवाबपुरा दरम्यान महापालिका निवडणुकांच्या (Election) तोंडावर निघालेल्या या राजकीय रॅलीत दोन गटांत घोषणाबाजी होऊन अंडी फेकल्याचा आणि दगडफेक झाल्याचा आरोप होता. ज्यामध्ये पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. या प्रकरणात साहिल कुरेशीवर धारदार शस्त्राने (पॉइंटर) हल्ला केल्याचा प्राथमिक संशय होता, मात्र तपासादरम्यान सदर शस्त्र एका विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून जप्त केले असून सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या जबाबावरून साहिलची प्रत्यक्ष हल्ल्यातील भूमिका स्पष्ट होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या प्रकरणातील इतर आरोपींची यापूर्वीच जामिनावर सुटका झाली असल्याने आणि साहिलचा कोणताही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसल्याने, 'समानतेच्या नियमा'नुसार त्याला 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर आणि तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला आहे. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. गोविंद एम. शर्मा यांनी युक्तिवाद केला. त्यांना अ‍ॅड. अभय अव्हाड, अ‍ॅड. स्नेहल शर्मा, अ‍ॅड. सुमित खोचे, अ‍ॅड. मोनिका जाधव व ऋषिकेश पुसे यांनी सहकार्य केले.

 Imtiaz Jaleel
Abhishek Kalamkar Bail Rejected : अभिषेक कळमकरला कोर्टाचा झटका! व्हिडिओ पुराव्यामुळे प्रकरण गंभीर वळणावर...

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर त्यांच्याच पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केला. महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारल्याच्या रागातून बायजीपुरा भागातून पक्षाची प्रचार रॅली जात असताना हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करत जलील यांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या एका समर्थकाला मारहाण केली.

 Imtiaz Jaleel
Subhash Zhambad : 125 कोटींच्या गैरव्यवहाराचा ठपका : देश न सोडण्याच्या अटीवर काँग्रेसच्या माजी आमदाराला जामीन

शिरसाट अन् सावेंवर केले होते आरोप

या हल्ल्या प्रकरणी इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हल्लेखोरांना त्यांचे संरक्षण असल्याचा दावा त्यांनी केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले होते. दुसरीकडे, काँग्रेसचे स्थानिक उमेदवार कलीम कुरेशी यांनी इम्तियाज जलील यांचे आरोप फेटाळत, इम्तियाज यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com