Abhishek Kalamkar Bail Rejected : अभिषेक कळमकरला कोर्टाचा झटका! व्हिडिओ पुराव्यामुळे प्रकरण गंभीर वळणावर...

Court rejects anticipatory bail plea of Sharad Pawar NCP former Ahilyanagar mayor Abhishek Kalamkar in rape case, citing seriousness of the allegations : अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर याचा अत्याचाराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
Abhishek Kalamkar Bail Rejected
Abhishek Kalamkar Bail RejectedSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar rape case : नोकरीच्या अमिष दाखवत युवती अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अहिल्यानगरचा माजी महापौर अभिषेक कमळकर (वय 35, रा. भुतकरवाडी, अहिल्यानगर) याला न्यायालयाने झटका दिला आहे. अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळला आहे.

जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी जोरदार युक्तिवाद केला.

माजी महापौर (Mayor) अभिषेक कळमकर याने, नोकरीच्या अमिषाने अत्याचार केल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीडिताने 21 फेब्रुवारीला दाखल केली होती. चारचाकी वाहनातून विळद इथं, निर्जन स्थळी नेत, वाहनातच अत्याचार केला. शिरूर (जि. पुणे) इथं लाॅजवर बोलावून घेत अत्याचार केला. यानंतर व्हिडिओ काॅल करत पीडितेचं शोषण केलं. या छळाला कंटाळून अभिषेकविरोधात अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी पोलिसांकडे गुन्हा नोंदवला.

गुन्हा (Crime) दाखल झाल्यापासून अभिषेक कळमकर हा पसार आहे. त्याच्या शोधासाठी दोन पथक रवाना आहेत. आता तर स्थानिक गुन्हे शाखा देखील तपासात उतरली आहे. यातच कळमकर याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर सरकारच्यावतीने लेखी म्हणणे सादर करण्यात आले.

Abhishek Kalamkar Bail Rejected
Rahuri By Election : “भाजपची गाडी फुल!” विखेंचं विधान; तनपुरेंच्या सीटसाठी ‘मामा’ जयंतराव फिल्डिंग लावणार?

गुन्ह्याचे तपासी अधिकारी न्यायालयात तपासाचे कागदपत्र घेऊन हजर होती. सरकार पक्षाच्यावतीनं विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी जोरदार युक्तिवाद केला. पीडित युवतीच्या गरीब असल्याचा फायदा घेत, नोकरीच्या अमिषाने तिचं शोषण करण्यात आलं आहे, याकडे लक्ष वेधलं.

Abhishek Kalamkar Bail Rejected
Bangladesh Issue Malegaon: सोमय्यांवर भोसले ‘अस्त्र’! नोटीस धाडली, बनावट आरोपांचा ससेमिरा अंगलट येणार

तसंच गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल जप्त होणे गरजेचं आहे. तसंच या गु्न्ह्यात आरोपीचे पीडिताबरोबर केलेले व्हिडिओ काॅल समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण खूप गंभीर आहे. या गुन्ह्यात इलेक्ट्रानिक्स पुरावे अधिक गोळा होण्याची गरज आहे. आरोपीकडे तपास होणे गरजेचा आहे, हे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.

आरोपीला राजकीय पार्श्वभूमी आहे, जामीन मिळाल्यास तो पीडितेवर दबाव आणू शकतो. पुरावे नष्ट करू शकतो. परिणामी पीडिता न्याय मिळण्यास अडथळा येऊ शकतो. या गुन्ह्यात न्याय व्हावा यासाठी आरोपीला अटक गरजेची आहे. सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने कळमकर याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com