Imtiaz Jaleel On Sharad Pawar : आघाड्यांमध्ये गुंतलेल्या पवारांच्या सद्यस्थितीला भाजप जबाबदार; इम्तियाज जलीलांनी टायमिंग साधलं

Aimim Imtiaz Jaleel Reacts on Sharad Pawar & Ajit Pawar Politics : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा डिजिटल'ला मुलाखत दिली.
Imtiaz Jaleel On Sharad Pawar
Imtiaz Jaleel On Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : राज्यात सध्या ठाकरे बंधू यांच्या युतीच्या चर्चांचा जोर आहे. यातच दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचा 26वा वर्धापनदिन पुण्यात होत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीत दोन्ही पवार एकत्र यावेत, अशा देखील चर्चा होत आहे.

दोन्ही राष्ट्रवादीमधील पदाधिकारी अन् कार्यकर्ते देखील एकत्र येण्याच्या तयारीत आहे. पण सद्यस्थिती राष्ट्रवादीला जुळवून देईल की नाही, हे सांगता येते नाही. यातच 'AIMIM' प्रदेशाध्यक्ष तथा नेते इम्तियाज जलील यांनी दोन्ही पवारांच्या ताकदीवर भाष्य केले आहे.

'AIMIM'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या सरकारनामा डिजिटलला धडाकेबाज मुलाखत दिली. सत्ताधीश भाजपच्या (BJP) वैचारिक दिवाळखोरीसह विरोधकांच्या स्वार्थी राजकारणावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. यातच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वगुणावर भाष्य केले.

इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) म्हणाले, "महाराष्ट्रात प्रशासनावर पकड असलेला एकमेव नेता म्हणजे, अजित पवार! शरद पवार यांचे आता वय झाले आहे. त्यांची क्षमता अफाट होती. राष्ट्रीय पातळीवर ते चमकले असते. महाराष्ट्रात देखील त्यांचा म्हणावा तसा प्रभाव दिसला नाही". एकहाती सत्ता त्यांना कधी मिळाली नाही. ते आघाड्यांच्या राजकारणात गुंतून पडले, असे निरीक्षक इम्तियाज जलील व्यक्त केले.

Imtiaz Jaleel On Sharad Pawar
Harshawardhan Sapkal BJP criticism : अण्णा हजारे अन् रामदेव बाबा आता कुठं आहेत? सपकाळांच्या टोमण्यांनी भाजप 'बेहाल'

"पवार परिवार विभागले गेले आहे. त्यावर भाष्य करताना, पवार परिवारात जे काही चालले आहे, ते दुर्दैवी आहे. भाजपने, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. आमच्यासोबत आले नाही, तर तुमच्या फाईल्स तयार आहेत", असे म्हणत इम्तियाज जलील यांनी भाजपला डिवचलं.

Imtiaz Jaleel On Sharad Pawar
Bachchu Kadu Rakesh Tikait: 'सिंदूर' वाटणारे म्हणतात ‘बटेंगे तो कटेंगे’; राकेश सिंह टिकैत यांची भाजपवर सडकून टीका

भाजपला अशा प्रकार डिवचतांना, भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा या नेत्यांना कार्यालयात बोलवत असतील, तेव्हा ते स्वीय सहायकाला सांगत असतील की, यांची फाईल्स माझ्यासमोर, टेबलावर ठेवा. मी जेव्हा त्यांच्याशी बोलेल, त्यांनी कमीत-कमी त्या बघायला पाहिजे. शरद पवार शुगर स्कॅम, अजित पवार इरिगेशन स्कॅम, तर कुठे ना कुठे दाबून आपला कार्यभाग साधून घ्यायचा, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी भाजपला सुनावलं.

लोकसभा जोरदार मुसंडी मारलेली महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत एकदम खाली आली. ईव्हीएम स्कॅम असू शकतो का? यावर बोलताना मला माहित नाही. पण, लोकशाहीत लोकांचे ऐकलेच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावी. रात्रीतून 'नोटबंदी' केली तसे 'ईव्हीएम' बंद करा. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्याने लोकांच्या मनातील शंका दूर होईल. लोकांना नको असेल तर का थोपवता, असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com