Bachchu Kadu Rakesh Tikait: 'सिंदूर' वाटणारे म्हणतात ‘बटेंगे तो कटेंगे’; राकेश सिंह टिकैत यांची भाजपवर सडकून टीका

Rakesh Tikait Slams BJP Over ‘Sindoor’ Politics and ‘Batenge to Katenge’ Remark : अमरावती इथं माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी नेते राकेश सिंह टिकैत यांनी पाठिंबा दिला.
Bachchu Kadu Rakesh Tikait
Bachchu Kadu Rakesh TikaitSarkarnama
Published on
Updated on

Farmers protest Amravati : केंद्र आणि राज्य सरकारने शेतीचे प्रश्‍न दुर्लक्षित राहावे, याकरिता शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडण्याचे काम चालविले आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कोणीच लढू नये याकरिता धोरण आखली जात आहेत. तर, दुसरीकडे हेच सिंदूर वाटून ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत आहे, असा घणाघात भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेशसिंह टिकैत यांनी केला.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी रविवारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राकेशसिंह टिकैत सोमवारी मोझरी इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळावर पोचले. टिकैत यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर थेट हल्ला चढविला.

राकेश सिंह टिकैत, "देशातील आणि राज्यातील भाजप (BJP) सरकारकडून आंदोलन आणि आंदोलनकर्त्यांना दडपविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नीती अवलंबिली जात आहे. त्याकरिता मुख्यत्वे दडपशाहीचा वापर होत असल्याचे चित्र आहे. साम, दाम, दंड, भेद रितीनुसार हे काम होत आहे. त्यामुळे देशभरात महागाई वाढत असून त्याविरोधात बोलण्याचे धाडस कोणी दाखवत नाही".

Bachchu Kadu Rakesh Tikait
BJP Radhakrishna Vikhe : 'ठाकरे बंधू, पवार काका-पुतण्याशी काहीही देणे-घेणे नाही'; मंत्री विखेंनी भाजप कार्यकर्त्यांना केलं 'अलर्ट'

'भविष्यात येत्या काळात आंदोलनकर्ते शिल्लकच राहणार नाहीत. तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, तर तुम्हाला दिल्लीत प्रवेश करता येणार नाही. मात्र कार असेल तर सहज जाता येईल. कारण त्यांना शेतकऱ्यांशी काहीच देणे घेणे नाही. त्यावरूनच येत्या काळात केवळ भांडवलदारच शिल्लक राहतील. सरकारची धोरणे ओळखून शेतकऱ्यांनी आणि सामान्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे', असेही राकेश सिंह टिकैत यांनी म्हटले.

Bachchu Kadu Rakesh Tikait
Maharashtra Election Issue : ‘चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात 15 दिवसांत 12 हजार परप्रांतीय मतदार कसे वाढले?’: काँग्रेसचा खडा सवाल

'सिंदूर' वाटणारे म्हणतात, ‘बटेंगे तो कटेंगे’

'सिंदूर' वाटणारे हे सरकार आहे. त्यांना आजवर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर भूमिका घेता आली नाही. तर दुसरीकडे ‘बटेंगे तो कटेंगे’, असा नारा देत आहेत. छत्तीसगड राज्यात शेतकऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू आहे. या ठिकाणी जमीन अधिग्रहण होत असताना सरकारच दर निश्‍चित करीत आहे. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, पण जमीन अधिग्रहण रात्रीच्या अंधारात होते, हे देशभरात सुरू आहे. सरकारला अदानी, अंबानीला देश विकायचा आहे, असा गंभीर आरोप राकेश सिंह टिकैत यांनी केला.

शेतकरी चळवळी संपविल्या जातील

येत्या काळात देशात वैचारिक क्रांती होणार आहे. सरकारची दडपशाहीची भूमिका लक्षात घेता, हिंसक प्रदर्शन करता येणार नाही. महात्मा गांधी यांच्या अहिंसक विचारानुसार धरणे द्यावे लागेल, अन्यथा शेतकरी चळवळी संपविल्या जातील, अशी भीती राकेश सिंह टिकैत यांनी व्यक्‍त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com