Mahavikas Aghadi News : 'वंचित'-'एमआयएम' वेटिंगवर; एकाला आघाडीत जायचंय, तर दुसऱ्याला नव्या भिडूचा शोध...

Vanchit Bahujan Aaghadi Join INDIA Alliance : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी आणि 'इंडिया' आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत.
Prakash Ambedkar and Asaduddin Owaisi
Prakash Ambedkar and Asaduddin Owaisi Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. सगळ्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असताना प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि ओवैसींचा एमआयएम पक्ष मात्र सध्या वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. खरं तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या दोन पक्षांच्या युतीने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. (Mahavikas Aghadi News)

दलित-मुस्लिम मतांचे समीकरण जुळून आल्यामुळे 'एमआयएम'चा राज्यात एकमेव खासदार छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडून आला. 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकर यांना मात्र अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात पराभूत व्हावे लागले. त्यानंतर सात महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच 'एमआयएम'-'वंचित'ची युती तुटली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar and Asaduddin Owaisi
Hingoli Lok Sabha Constituency: शाखाप्रमुख ते खासदार; हेमंत पाटील हिंगोलीतून दुसऱ्यांदा विजय मिळवणार ?

आंबेडकरांनी एकला चलो रे चा मार्ग निवडला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मात्र त्यांना राज्यात महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील 'इंडिया' आघाडीत जायचे आहे. यासंदर्भात आतापर्यंत अनेक चर्चा, बैठका झाल्या. मात्र त्यातून 'वंचित'ला अद्यापही काहीच साध्य झालेले नाही. दररोज राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांची नवनवीन विधाने समोर येत आहेत.

आंबेडकरांनी दुसरीकडे ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यांना हजेरी लावत दुसरा पर्याय खुला ठेवला आहे. 'वंचित'च्या महाविकास आघाडीमधील समावेशाचा निर्णय जसजसा लांबत आहे, तशी आंबेडकर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. आघाडीने जास्तच ताणले तर प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवू शकतात, अशीदेखील शक्यता वर्तवली जात आहे.

इकडे 'वंचित'ची ही अवस्था, तर दुसरीकडे 'एमआयएम'लाही गेल्या साडेचार वर्षांत युतीसाठी नवा साथीदार मिळालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे आणखी खासदार वाढवणे तर दूरच, पण आहे त्या एकमेव खासदाराला निवडून आणण्यासाठीही 'एमआयएम'ची दमछाक होणार आहे.

खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी 'एमआयएम'ला महाविकास आघाडी व 'इंडिया' आघाडीत घ्या, अशी मागणी करीत राज्यात हवा केली होती. परंतु त्यांची ही मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर असताना 'एमआयएम' स्वबळावर कितपत टिकाव धरू शकेल, हा मोठा प्रश्न असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Prakash Ambedkar and Asaduddin Owaisi
Dharashiv lok sabha constituency : आमदारकीची हॅटट्रिक; आता विक्रम काळेंना खासदारकीचे वेध

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com