Imtiaz Jaleel : खासदार इम्तियाज जलील यांना भलताच 'काॅन्फिडन्स'; म्हणाले, '...तर मला मतदान करू नका'!

Imtiaz jaleel News: 'मी काम केले नसेल तर मला मतदान करू नका...'; खासदार इम्तियाज जलील यांचं मतदारांना आवाहन
MP Imtiaz Jaleel
MP Imtiaz Jaleel Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati SambhajiNagar : राजकारणात न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होतांना आपण नेहमीच पाहतो. पण एखादा खासदार आपल्या मतदारांना मी काम केले नसेल तर मला मतदान करू नका, असे म्हणण्याचे धाडस करत असेल तर त्याचे कौतुकच करावे लागेल. 'एमआयएम'चे महाराष्ट्रातील एकमेव खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या मतदारांना हे आवाहन केले आहे.

छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या दुवा फाऊंडेशनच्यावतीने 'आय जे महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्रिडा स्पर्धा, खाद्य पदार्थांचे स्टाॅल या माध्यमातून दोन आठवड्यापासून शहरातील आमखास मैदानावर हा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात बोलतांना त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात विचारले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Imtiaz Jaleel
Ahmednagar Breaking News : नगर जिल्हा 'हाय अलर्ट'वर; जरांगे,भुजबळांच्या सभांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून जमावबंदी

यावर आमदारकीची पाच व आता खासदार म्हणून काम केले तो कालवधी अशी दहा वर्ष जर मी लोकांची कामे केली असतील, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असतील तर लोक मला निवडून देतील. जर त्यांना असे वाटत असेल की मी दहा वर्षात काहीच काम केले नाही, तर त्यांनी मला मतदान करू नये, राजकारण असेच असले पाहिजे, अशी सडेतोड भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक होत असले तरी त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाखाणण्याजोगा म्हणावा लागेल.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'एमआयएम'-'वंचित' आघाडीकडून लढलेल्या इम्तियाज जलील यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी विजय झाला होता. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला हादरा देत त्यांनी राज्यात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्याआधी 2014 ते 19 दम्यान त्यांनी मध्य विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. आपल्या दहा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीचा लेखाजोखा इम्तियाज जलील मतदारांसमोर मांडत आहेत.

एक्सीडेंटल एमपी अशी टीका सहन करत इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जोरकसपणे भूमिका निभावली. रस्त्यावर आणि सभागृहातही इम्तियाज जलील यांचा आवाज चांगलाच घुमला. या जोरावरच मतदार आपल्याला पुन्हा मत देऊन दिल्लीत पाठवतील, असा त्यांना विश्वास वाटतो.

पण हा विश्वास व्यक्त करतांनाच `मी दहा वर्षात लोकांची कामे केली असतील, त्यांचे प्रश्न सोडवले असतील, तर ते मला मत देतील. जर त्यांना मी काहीच केले नाही असे वाटत असेल, तर त्यांनी मला मतदान करु नये, असे आवाहन करण्याचे धाडस इम्तियाज जलील दाखवतात. त्यांच्या या धाडसाचे कौतुक करावे कमीच म्हणावे लागेल.

(Edited By : Ganesh Thombare)

MP Imtiaz Jaleel
Parbhani VBA : आघाडीत घेतले नाही, तर 'वंचित' अनेकांचा खेळ बिघडवणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com