Aimim News : दंगल प्रकरणात निरपराधांना अटक करू नका, एमआयएमची मागणी..

Police : कुठल्याही निरपराध व्यक्तीला अटक किंवा त्यांची चौकशी केली जाणार नाही.
Aimim News, Chhatrapati Sambhajinagar
Aimim News, Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : रामनवमीच्या एक दिवसआधी शहरातील किराडपुरा भागात दंगल उसळी होती. (Aurangabad) या घटनेत दंगेखोरांनी पोलिसांना आपले लक्ष्य केले होते, पोलिसांची वाहने व काही खाजगी गाड्या पेटवून देण्यात आल्या होत्या, शिवाय पोलिसांवर दगडफेक व लाठ्याकाठ्यांनी देखील हल्ला करण्यात आला होता.

Aimim News, Chhatrapati Sambhajinagar
Dr. Bhagwat Karad On Savarkar Rally : `सावरकर यात्रा` महत्वाची म्हणून मी सुट्टी घेतली, आता उद्या दिल्लीला जाणार..

या दंगल प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी (police) विशेष पथकाच्या माध्यमातून चौकशी केली आहे. आतापर्यंत १८ हून अधिक दंगेखोरांना पोलिसांनी ओळख पटवून अटक केली आहे. या शिवाय घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपांचा देखील पोलिस शोध घेत आहेत. (Aimim) दरम्यान, दंगल प्रकरणी पोलिसांकडून काही निरपराध मुस्लिम तरूणांना देखील पोलिस उचलून घेवून जात असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.

प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ. गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नुकतीच पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना देण्यात आलेल्या निवदेनात ज्यांचा दंगलीशी संबंध नाही, अशा निरपराध तरुणांना ताब्यात घेणे, त्यांना चौकशीला बोलवणे थांबवावे, त्यांना विनाकारण त्रास देवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

जे दोषी आहेत, त्यांना निश्चित शिक्षा झाली पाहिजे, पण निरपराध तरुणांची चौकशी केली जात असल्याने, त्यांना पोलिस उचलून नेत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. तरुण दहशतीखाली आहेत.

यावर पोलिस आयुक्तांनी दंगेखोरांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच आहे. परंतु कुठल्याही निरपराध व्यक्तीला अटक किंवा त्यांची चौकशी केली जाणार नाही, असे आश्वासन देखील पोलिस आयुक्तांनी या शिष्टमंडळाला दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com