Dr. Bhagwat Karad On Savarkar Rally : `सावरकर यात्रा` महत्वाची म्हणून मी सुट्टी घेतली, आता उद्या दिल्लीला जाणार..

Chhatrapati Sambhajinagar : शहरातील पुर्व, पश्चिम आणि मध्य या तीन्ही विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा काढण्यात आली.
Savarkar Pride Rally News
Savarkar Pride Rally NewsSarkarnama
Published on
Updated on

Bjp : भाजप आणि शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात सुरू करण्यात आलेल्या `सावरकर गौरव` यात्रेत आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड सहभागी झाले. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या पुर्व विधानसभा मतदारसंघातून सावकर यात्रा काढण्यात आली.

Savarkar Pride Rally News
Babanrao Lonikar On Thackeray : निष्क्रिय अन् भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून तुमची ओळख होती, म्हणून तोंड सांभाळून बोला..

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ही यात्री किती महत्वाची आहे, हे सांगण्यासाठी यात्रेमुळे आपण दिल्लीची महत्वाची बैठक रद्द केली. सुट्टी घेतली आणि आता यात्रा संपवून रात्री उशीरा पुणे आणि तिथून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Bjp) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला उपस्थितीत राहणार असल्याचे कराड (Dr.Bhagwat Karad) यांना सांगितले.

स्वातंत्र्यावीर सावरकर आजच्या पिढीला कळावेत, हा या यात्रेमागचा हेतू आहे. त्यामुळे यापुढे देखील सावरकर गौरव यात्रे असेच मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील कराड यांनी केले. २ एप्रिलपासून सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात आली आहे. शहरातील पुर्व, पश्चिम आणि मध्य या तीन्ही विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा काढण्यात येत आहे. २ ते ८ एप्रिलपर्यंत ही यात्रा चालणार आहे.

आज पुर्व विधानसभा मतदारसंघातील गजानन महाराज मंदिरासमोर सावरकर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. यानंतर मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे. काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करणारे विधान केल्यानंतर भाजपने आक्रमक होत राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली होती.

छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीच्या `वज्रमुठ` सभेच्या दिवशीच सावरकर गौरव यात्रेला सुरूवात करण्यात आली होती. शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com