Aimim On Pmay News : पंतप्रधानांचे घरकुल, `सपनो का घर सपने मे`, एमआयएमने उडवल्ली खिल्ली..

Marathwada : इम्तियाज जलील यांनी घरकुल योजनेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
Aimim On Pmay News
Aimim On Pmay News Sarkarnama
Published on
Updated on

Mp Imtiaz jalil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा प्रचारा दरम्यान, २०२२ पर्यंत गरीबांना घर देण्याचे आश्वासन दिले होते. (Aimim On Pmay News) त्यानंतर प्रत्येक गरीब माणूस आपल्याला घर मिळणार याचे स्वप्न रंगवू लागला होता. पण मन की बात करणाऱ्या पंतप्रधानांच्या घरकुल योजनेचा बोजवारा उडाला आहे.

Aimim On Pmay News
Congress Jalna Loksabha News : जालन्याची जागा काॅंग्रेसच लढवणार, दानवेंना टक्कर देणार..

छत्रपती संभाजीनगरात बांधण्यात येणारे घरकुल अजून टेंडरमध्येच अडकले आहे. २०२३ उलटून गेले तरी अद्याप गरीबांच्या घरांसाठीची एक वीटही रचली गेलेली नाही. (Aurangabad) याचा निषेध म्हणून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी उद्या (ता.११) रोजी उपहासात्मक प्रातिनिधिक घरकुलांचे वाटप करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्याअसून या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्घाटक म्हणून आंमत्रित करण्यात आले आहे. (Aimim) या शिवाय राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना देखील या घरकुल वाटप कार्यक्रमास बोलावण्यात आले आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून शहरातील पंतप्रधान घरकुल योजना आणि त्यातील निविदा प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाराचाराचे प्रकरण चांगलेच गाजते आहे. या प्रकरणाची दखल थेट ईडीने घेतली होती. महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांची देखील या प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. गेल्या तीन-चार वर्षापासून घरकुल योजना रखडली असून लाभार्थ्यांना घर मिळण्याचे स्वप्न हवेतच विरले आहे.

एमआयएमने या प्रश्नावर आता केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांना निशाणा करत उपहासात्मक घरकुल वाटपाचा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी घरकुल योजनेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने त्याने जिल्ह्यातील केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांवर देखील टीका केली आहे. घरकूल योजना रखडण्यात या मंत्र्यांचा देखील वाटा असल्याचा आरोप करत इम्तियाज यांनी त्यांना कार्यक्रमास आममंत्रित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com