Marathwada : लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असताना जालना लोकसभा मतदारसंघावर यंदा राष्ट्रवादीकडून भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Congress Jalna Loksabha News) राष्ट्रवादीने जरी या जागेवर दावा सांगितला असला तरी जालन्याची जागा काॅंग्रेसकडेच राहील, आम्हीच ही जागा लढवू आणि ताकदीने लढवू, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला.
ही जागा आघाडीत सुरुवातीपासून (Congress) काॅंग्रेसकडेच आहे, आमची जिल्ह्यात राष्ट्रवादीपेक्षा जास्त ताकद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही देशमुख यांनी सांगितले. (Jalna) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुण्यात झालेल्या लोकसभा आढावा बैठकीत जालना जिल्ह्यातील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी जालना लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्या, अशी आग्रही मागणी केली.
राजेश टोपे, चंद्रकांत दानवे यांच्या उमेदवारीवर देखील बैठकीत खल झाला. त्यामुळे काॅंग्रेसच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. (Raosaheb Danve) परंतु जालना लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार असून जागा वाटपासंदर्भात सध्या कुठलीही अधिकृत बोलणी पक्ष पातळीवर व महविकास आघाडीच्या बैठकीत सुरू नाही. (Ncp) असा कुठलाच फेरबदल झालेला नाही, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
जालना हा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ काँग्रेसकडेच आहे. स्वर्गीय माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्यानंतर हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र २००९ साली आमदार कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना तगडी लढत दिली होती. २०१४ व २०१९ ला मोदी लाटेत रावसाहेब दानवे दोन ते तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले असले तरी यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा झालेला विजय व भारत जोडो यात्रेचा मोठा सकारात्मक परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल, असा दावा देखील देशमुख यांनी केला. महागाई ,बेरोजगारी, धार्मिक ध्रुवीकरण या मुद्द्यांवर सर्वसामान्य जनता भाजपला वैतागली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील. भोकरदन नगरपरिषद ,जालना नगरपरिषद ही काँग्रेसच्या ताब्यात असून जालना जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार आहेत.
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती देखील काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघात चांगले संघटनात्मक कार्य आहे. महाविकास आघाडीमुळे यंदा काँग्रेस रावसाहेब दानवेंना टक्कर देऊ शकते. शिवाय २००९ पासून या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवार देण्यात आला होता. यंदा जालना जिल्ह्यातून उमेदवार दिल्यास निश्चितच काँग्रेस पक्षाला याचा मोठा फायदा होईल.
राष्ट्रवादीने जरी जालना लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलेला असला तरी महाविकास आघाडी कुठलाही बेबनाव व नकारात्मक परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीमुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होणार असून जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सक्षम आहेत, असेही देशमुख म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.