Aimim : आमच्यासोबत असते तर प्रकाश आंबेडकर किंगमेकर ठरले असते..

Vanchit Aghadi : प्रकाश आंबेडकरांचा मार्ग चुकला आहे, वंचित-एमआयएमची युती ही खरी नैसर्गीक युती होती.
Ambedkar-Imtiaz News, Aurangabad
Ambedkar-Imtiaz News, AurangabadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Imtiaz Jalil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाशी युती करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना व वंचित आघाडीची घोषणा होण्याआधी बाजी मारली. याची चर्चा सुरू असतांनाच प्रकाश आंबेडकर (Aimim) एमआयएम सोबत असते तर किंगमेकर ठरले असते, असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित आणि शिवसेनेच्या संभाव्य युतीवर भाष्य केले.

Ambedkar-Imtiaz News, Aurangabad
Bawankule : सभा फ्लाॅप तरी भाजप फाॅर्मात, औरंगाबादची जागा दोन लाखांनी जिंकण्याचा दावा..

वंचितची एमआयएमसोबतची युतीच खरी आणि नैसर्गिक होती, असेही ते म्हणाले. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येत आहेत. (Vanchit Bahujan Aghadi) वंचित आघाडी व उद्धव ठाकरेंच्या (Shivsena) शिवसेनेसोबतच्या युतीची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे.

प्रबोधनकार ठाकरेंच्या जंयती दिनानिमित्तच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर तर ही युती नक्की होणार असा दावा केला जात होता. परंतु वाटाघाटी अन् चर्चा पुढे न सरकल्यामुळे ही संभाव्य युती रखडली. आता नव्याने दोन्ही नेत्यांच्या चर्चेला वेग आला असून कोणत्याही क्षणी वंचित आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आघाडीची घोषणा होवू शकते.

या पार्श्वभूमीवर वंचितचा जुना सहकारी पक्ष असलेल्या एमआयएमने यावर भाष्य केले. इम्तियाज जलील म्हणाले, प्रकाश आंबेडकरांचा मार्ग चुकला आहे, वंचित-एमआयएमची युती ही खरी नैसर्गीक युती होती. ती तुटायला नको होती. आज प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत असले तर किंग किंवा किंगमेकर ठरले असते. पण त्यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार देखील आहे, असेही इम्तियाज म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.