Aimim : आम्हाला युतीच्या कुबड्यांची गरज नाही ; हिमंत असेल तर एकटे समोर या..

जानेवारी ते जुलै या सात महिन्यात राज्यातील ५१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, मात्र यावर सत्ताधारी, विरोधक काहीच बोलायला तयार नाहीत. (Mp Imtiaz Jalil)
Mp Imtiaz Jalil-Uddhav Thackeray News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Uddhav Thackeray News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : शिवसेना- संभाजी ब्रिगेड, भाजप- शिंदे सेना व काॅंग्रेस-राष्ट्रवादी या सर्व पक्षांमध्ये एकट्याने लढण्याची हिमंत नाही. ते सक्षम नाहीत, म्हणूनच त्यांना युतीच्या कुबड्यांची गरज लागते. (Aimim) एमआयएमला आपली ताकद माहित आहे, आम्हाला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही. या सगळ्या पक्षांना माझे आव्हान आहे, हिमंत असेल तर औरंगाबादेत एकट्याने येवून आमच्या लढून दाखवा, असे खुले आव्हान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी विरोधी पक्षांना दिले आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, कार्यकर्ते सध्या सैरभैर झाले आहेत, संभाजीनगरच्या नामांतराचा विषय आम्हाला माहित नाही म्हणणारे व त्यांच्या पक्षाचे नेतेच आता छत्रपती संभाजीगर असा उल्लेख करत असल्याचा टोला देखील इम्तियाज यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव घेत लगावला. (Marathwada) राष्ट्रवादी देखील आता हिंदुत्वाकडे झुकत असल्याचे ते म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी राज्यातील राजकीय परिस्थिीवर भाष्य केले. शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीचा दाखला देत त्यांनी सत्ताधारी व अन्य विरोधी पक्षांना आव्हान देतांनाच आम्ही स्वतंत्र आहोत, युतीच्या कुबड्यांची गरज नसल्याचेही ठणकावून सांगितले.

इम्तियाज जलील म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सत्ताधाऱ्यांना जनतेशी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काहीच घेणेदेणे नाही हे स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यात राज्यातील ५१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, मात्र यावर सत्ताधारी, विरोधक काहीच बोलायला तयार नाहीत. त्यांना फक्त सत्ता आणि युतीमध्येच रस आहे. जे पक्ष कुमकुवत असतात, ज्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसतो त्यांनाच अशा कुबड्यांची गरज पडते.

Mp Imtiaz Jalil-Uddhav Thackeray News, Aurangabad
Aurangabad : टीईटी घोटाळ्यात सत्तारांना घेरण्यासाठी शिवसेना अवाज उठवणार..

एमआयएमची ताकद आम्ही ओळखून आहोत, त्यामुळे आम्ही स्वतंत्रच राहणार, आम्हाला कुबड्यांची गरज नाही. हिमंत असेल तर या सगळ्या पक्षांनी एकट्याने समोर येवून आमचा मुकाबला करून दाखवावा, असे आव्हान देखील इम्तियाज यांनी दिले. राष्ट्रवादी काॅंग्रेस हा पक्ष देखील इतर पक्षांप्रमाणेच जातीयवादी असल्याचा आरोप करतांना बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या संपत्ती संदर्भात चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्ष नेत्यांनी केल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com